बांधकाम विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सरपंचाना

0
14
गोंदिया,दि.२७_–गोदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातंर्गत विविध लेखाशिर्ष अंतर्गत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या स्थानिक विकास कार्यक्रमातील कामांचे वाटप करण्यासाठी काम वाटप सqनयत्रण समितीची सभा २६ फेबुवारीला सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती.मात्र या समितीचे पत्रच जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवकांना मिळाले नसल्याचे तपासाअंती समोर आल्याने बांधकाम विभागाने २६ च्या बैठकीसाठी २५ फेबुवारीला काढलेल्या पत्रावर शंका निर्माण झाली आहे.हे पत्र फक्त कागदोपत्री दाखवून आधीच लोकप्रतिनिधींनी ठरविलेल्या कंत्राटदाराला देण्यासाठी केलेला आटापिटा तर नव्हे ना असे बोलले जात आहे.त्यातही एका सदस्यांने तर चक्क माझ्यामर्जीप्रमाणे माझ्या मतदारसंघातील काम कंत्राटदारसंस्थेला मिळत नसतील मला काही देणे घेणे नाही असे म्हणून लोकप्रतिनिधीच विकासाच्या नावावर कंत्राटदारासाठी अधिकाèयांवर दबाव घालत असल्याचे समोर आले आहे.
गोदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातंर्गत जिल्हा निधीतून विविध कामे करण्यासाठी निविदाप्रकियेसह कामवाटप प्रकिया आपल्या पातळीवर करण्यात येते.त्यातच २०१७-१८ या वर्षाच्या कामांची सुध्दा ई निविदा प्रकिया अद्यापही पुर्ण झालेली नाही,यावरुन या विभागाचे प्रमुख असलेल्या अति.मुकाअ व कार्य.अभियंत्यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.तर शुल्लक शुल्लक फाईलीसुध्दा अति.मुकाअ आपल्याकडे मागवून उशीर करीत असल्याचे बोलले जात आहे.
त्यातच २६फेबुवारीला विविध लेखाशिर्ष अंतर्गत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या स्थानिक विकास कार्यक्रमातील कामांचे वाटप करण्यासाठी काम वाटप सqनयत्रण समितीची सभा आयोजितसकाळी ११ वाजता करण्यात आली होती.या समितीचे पत्र जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवकांनाही पाठविण्यात आल्याचा उल्लेख आहे.ही सभा २६ फेबुवारीला असताना पत्र मात्र २५ फेबुवारीला काढले जात असल्याने जिल्हा मुख्यालयापासून ८० ते १२५ किलोमटर अंतरावरील ग्रामपंचायतीना हे पत्र कसे मिळाले असेल qचतनाचा विषय झालेला आहे.या विभागाचे प्रमुख अति.मुकाअ आजकल प्रत्येक फाईल आपल्या टेबलावर बोलावत बसले आहेत जे काम कार्यकारी अभियंतास्तरावर होऊ शकते ते सुध्दा त्यामुळे तर हे पत्र निघायला उशीर झाले नाही ना असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत.२६ फेबुवारीला जेव्हा या कामवाटप सनियंत्रण समितीच्या पत्राबाबत देवरी तालुक्यातील लोहारा ग्रामपंचायत सरपंच राकेश चांदेवार,डवकीचे उमराव बावनकर व छत्रपाल राऊत वडेगाव यांना विचारणा केल्यावर असे पत्र कधीच ग्रामपंचायतीला येत नाही आणि आजच्या बैठकीचे सुध्दा पत्र मिळाले नसल्याचे सांगितले.विशेष म्हणजे या पत्रात ग्रामपंचायतीच्या सरपंच व सचिवांना आपण हजर न राहिल्यास आपल्या हद्दीतील मंजुर कामे करण्यास असमर्थ असल्याचे गृहीत धरुन ते काम मजुर सहकारी संस्था,बेरोजगार अभियंत्यांना व नोंदणीकृत कंत्राटदाराला देण्यात येणार असल्याचा उल्लेख असल्याने विभागाच्यावतीने जाणिवपुर्वक पत्र उशीरा काढले गेल्याचे स्पष्ट होत आहे.जेव्हा की अशा बैठकांचे व सभांचे पत्र हे किमान एक आठवड्याआधी निघायला हवे परंतु याठिकाणी तसे न होणे म्हणजेच काम वाटपाच्या निविदा व यादी मॅनेज करण्याचाच प्रकार असल्याचे उघड होत असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याप्रकरणात स्वतः लक्ष घालण्याची वेळ आली आहे.
तर याच बांधकाम विभागामार्फेत लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यालयाचे कायाकल्प करण्यात येत आहे.वास्तविक या विभागाचे प्रमुख हे पारदर्शक प्रशासकीय कामासाठी ओळखले जातात.त्यांच्याच कार्यकाळात त्यांच्या कार्यालयाचे कायाकल्प करण्यात येत आहे,त्यासाठी मात्र त्यांनी ईनिविदेचा सहारा न घेता काम वाटप समितीच्या माध्यमातून हे काम सुरु केले आहे.जर काम वाटप समितीची बैठकच व्हायची असेल तर त्यांनी काम कसे सुरु केले असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून या सर्व प्रकरणात अति.मुकाअ यांचीही भुमिका वादातीत दिसून येत आहे.