दुसèयादिवशीही प्रकल्पग्रस्त श्रीरामनगरवासीयांचे जंगलातच तळ

0
10
गोंदिया,,दि.२७_: नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले. सोयीसुविधा मात्र पुरविण्यात न आल्याने कवलेवाडा, कालीमाती आणि झंकारदेवी येथील सहाशेच्यावर गावकèयांनी पुन्हा आपल्या मूळ गावाकडे सोमवारला कूच केली होती.सोमवारी निघालेल्या या गावकèयाना पोलीस व वनविभाग प्रशासनाने तारेचे कुंपन लावून वाटेतच अडवल्याने सोमवारची रात्रही त्यांनी जंगलातच काढली.याप्रकरणाला घेऊन शासकीय पातळीवर ज्यापध्दतीने कारवाई व्हायला हवी होती,ती अद्यापही झालेली दिसत नाही.तर ड्रोनच्या मदतीने प्रकल्पग्रस्तांच्या हालचालीवर नजर ठेवली जात आहे.
 सोमवारला माजी आमदार रामरतन राऊत यांनी आदिवांसीची भेट घेऊन चर्चा केली.त्यानंतर आज मंगळवारला बहुजन समाज पक्षाच्या नेत्या डॉ.विजया ठाकरे नांदुरकर,काँग्रेसचे राजेश नंदागवळी यांनी प्रकल्पग्रस्तांची भेट घेत माहिती जाणून घेतली.डॉ.विजया ठाकरे नांदुरकर यांनी सांगितले की,प्रकल्पग्रस्तांना अद्यापही त्यांच्या नावावर पुनर्वसन करण्यात आलेल्या जागेचे पट्टे करण्यात आलेले नाही.शेतजमिन दिलेली नाही.१० लाख रुपये जे देण्याचे कबुल केले त्यापैकी फक्त ५ लाख रुपये दिले असून धोरणानुसार त्यांना प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळायला हवे होते,ते सुध्दा अद्यापही देण्यात आले नसून मोबदला पण योग्यरित्या दिले गेले नसल्याने या सर्व बांधवानी लहानमुलासंह आपलातळ जंगलातच ठोकला आहे.या प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी त्यांच्या लढाईत सोबत असल्याचे सांगितले. त्यांना अडविल्याने तणाव निर्माण होऊन मूळ संघर्ष निर्माण झाला आहे. यापूर्वी मेळघाटातही याच पद्धतीचा वाद निर्माण झाला होता.
प्रकल्पग्रस्तांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन सुरू केल्याने सरकार आणि प्रशासनासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. आंदोलन मोडीत काढण्यात अधिकारी खोट्या गुन्ह्याखाली अटक करण्याची धमकी देत असल्याचा आरोप श्रीरामपूरवासीयांनी केला आहे.प्रकल्पग्रस्त सोमवारी आपण आपल्या मूळ गावी परतणार असल्याचा इशारा श्रीरामपूर येथील नागरिकांनी दिला होता. यातून प्रशासनाची नाचक्की होणार असल्याचे लक्षात येताच वन विभागाने पोलिसांचा बंदोबस्त लावला. सुमारे तीनशे पोलिस आणि वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी अद्यापही तैनात आहेत. गावात जाण्याच्या मार्गावर तारांचे कुंपन टाकून त्यांची वाट अडविण्यात आली.