पतीने केली पत्नीची कुर्‍हाडीने हत्या

0
11

गडचिरोली,दि.27ः- क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीची कुर्‍हाडीने गळा चिरून हत्या केल्याची घटना चामोर्शी तालुका मुख्यालयापासून १३ किमी अंतरावर असलेल्या आमगाव चक नं.१ येथे काल २५ फेब्रुवारी रात्रीच्या सुमारास घडली. प्रेमिला संदीप गावडे असे मृत महिलेचे नाव आहे. यामुळे परिसरात विविध चर्चाना पेव फुटले आहे.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील आमगाव चक नं. १ येथील रहिवासी संदीप गावडे (३८) याचे पत्नी प्रेमिला गावडे हिच्यासोबत क्षुल्लक कारणावरून व संशयावरून भांडण व्हायचे. काल रात्रीच्या सुमारास पतीने संदीप व पत्नी प्रेमिला यांच्यात भांडण झाले. यावेळी पती संदीप गावडे याचा राग अनावर झाल्याने त्याने प्रेमिला हिच्या गळय़ावर कुर्‍हाडीने वार केला. त्यामुळे प्रेमिला रक्ताच्या थारोळय़ात खाली कोसळली व तिचा जागीच मृत्यू झाला. पत्नी मृत पावल्याचे कळताच पती संदीप गावडे हा घरातून पसार झाला. घटनेची माहिती चामोर्शी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रकाश तुनकलवार करीत आहेत. मृतक प्रेमिला गावडे हिला ८ वर्षाची १ मुली व ६ वर्षाचा मुलगा आहे. या घटनेमुळे आमगाव चक नं. १ परिसरातील शोककळा पसरली आहे.