इच्छाशक्ति ही लक्ष्य गाठण्याची कुंजी: धारगावे

0
16
गोंदिया,दि.08: जिवनात काहीच अशक्य नाही, इच्छाशक्ति असली की यश मिळणारच. तसेच यश टिकवून ठेवणे महत्वाचे आहे, परंतु कधी-कधी मेहनत घेऊनही अपेक्षीत यश मिळाले नसेल तर निराश होऊ नका प्रयत्न करा नक्कीच यश मिळेल असे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष देवसूदन धारगावे उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गोंदिया यांनी शोध ऊर्जेचा-ग्रामीण क्षमतेचा व्याख्यानमाला या कार्यक्रमात व्यक्त केले.
  विद्यार्थ्यांना जिवनात यश मिळावे या करिता सामाज कल्याण विभाग, सामाजिक न्यायभवन तर्फे शोध क्षमतेचा ग्रामीण ऊर्जेचा व्याख्यानमाला अंतर्गत ज्ञानगंगा अभ्यासिकेच्या माध्यमातून सामाजिक न्यायभवन गोंदिया येथे 5 मार्च रोजी शासकीय सेवेत कार्यरत विद्याथ्यांचे सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन डॉ. मंगेश वानखेडे, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय तसेच विशेष अतिथी म्हणून नंदकिशोर भंडारी, अपर कोषागार अधिकारी या कार्यक्रमात उपस्थित होते.
 सदर कार्यक्रमात शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. शोध क्षमतेचा ग्रामीण ऊर्जेचा व्याख्यानमाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हयात एकुण 25 विद्यार्थ्यांची निवड विविध शासकीय विभागात झाली आहे. मंचावर उपस्थित सत्कारमुर्ती जयकृष्ण दखने यांनी  आपले अनुभव या ठिकाणी मांडताना सांगितले की टार्गेट वर नजर ठेवून आपले सर्वस्व समर्पणामुळे यश प्राप्त होणारच तसेच मेहनतीला दुसरा पर्याय नसतो अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दखने यांची निवड टेक्नीशीयन म्हणुन अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) हैदराबाद येथे झाली आहे. आपल्या मार्गदर्शनात डॉ. वानखेडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करण्याचे संदेश दिले. त्यांनी सांगितले की सामाजिक न्यायभवन येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक सोयी सुविधा पूरविण्यात आलेल्या असून 20 किलोमिटर दूर वरुन विद्यार्थी  वाचनालयमध्ये येतात.
स्पर्धात्मक परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन तसेच पुस्तकांसाठी 1 लक्ष निधी 7 तालुक्यांना एकुण 7 लक्ष निधी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शोध क्षमतेचा ग्रामीण ऊर्जेचा व्याख्यानमाला अंतर्गत ज्ञानगंगा अभ्यासिकेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात पुस्तके खरेदी करुन सदर व्याख्यानमाला तालुकास्तरावर राबविण्यात येईल. जेणे करुन 20-25 किलोमिटर अंतरावरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ मिळणार.
– जिल्हाधिकारी डॉ. कादम्बरी बलकवडे