भाजपच्या नेत्यांना आठवू लागले जि.प.सदस्य व पदाधिकारी

0
11

शिवणकरांच्या प्रवेशाने भाजपमध्ये मंथनाचा दौर
गोंदिया-भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकरांसह काही जिल्हा परिषद सदस्यांनी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने भाजपवर मंथनाची वेळ आली आहे.विशेष म्हणजे शिवणकरांच्या प्रवेशाच्या आदल्यादिवशीपासून सर्वांना दूरध्वनी करून तुम्हाला योग्य तो न्याय मिळेल पद मिळेल पक्ष सोडू नका असे दूरध्वनी सुध्दा करण्यात आले,परंतु शिवणकरांशी सवांद साधण्याची साधी हिमंत भाजपचे नेते दाखवू शकले नाही.त्यांच्या प्रवेशानंतर सोमवारी मात्र उरलेल्या २० जिल्हा परिषद सदस्यासंह तालुकाध्यक्ष,विविध आघाडीच्या अध्यक्षांची तातडीची बैठक आयोजित करून त्यांच्या मनातील विषय जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.बैठकीत जरी सभासद नोंदणीचा मुद्दा झाल्याचे सांगण्यात येत असले तरी खरी बैठक ही शिवणकरांच्या पक्षबदलानंतर इतर सदस्यांच्या मनधरणीसाठीच होती.ज्या नेत्यांनी टोपली व घडीचा काम केले म्हणून वारवांर हिणवणे सुरूच ठेवले त्यांचे हिनवणे काहींनी कबूल करीत बैठकीला हजेरी लावली.त्यातच देवरीतील जिल्हा परिषद सदस्य सुध्दा पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याने त्यांनाही तुमच्या घरी बसायचे आहे,असे काही नेते बोलू लागले आहेत.तर शिवणकरांच्या गेल्याने काही आमचा पक्षाला फरक पडणार नसल्याचे काही जि.प.सदस्य बोलत असले जिल्हा परिषदेत कही खुशी कही गम सारखे चित्र आहे.काही पदाधिकारी आतून आनंदीत होते,परंतु चेहèयावर शिवणकरांच्या पक्ष सोडल्याचा दुःख ही दिसून येत होता.