जि.प.च्या सर्वसाधारणसभेकडे सर्वांचे लक्ष

0
7

गोंदिया-गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय शिवणकर यांनी रविवारी केलेल्या पक्षबदलानंतर बुधवारी होणाèया सर्वसाधारणसभेकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.भाजपसोडून गेलेले विजय शिवणकर हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य झाले आहेत.त्यामुळे त्यांच्यावर उद्या भारतीय जनता पक्षाच्यावतीने सभा सुरू होताच राजीनाम्याची मागणी केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अध्यक्षांनी पक्ष बदलल्याने त्यांच्यासोबत बसणारे पदाधिकारी हे सभेच्यावेळी काय भूमिका घेतात याकडेही लक्ष लागले आहे.काहींनी शिवणकरांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.तर विजय शिवणकर यांनी आपण पक्ष बदलला आहे,जिल्हा परिषद सदस्यात्वाचा राजीनामा दिलेला नाही.आपण सभागृहाचे सदस्य असल्याने अध्यक्षपदी राहण्याचा अधिकार आहे.भाजपला वाटत असेल तर त्यांनी कारवाई करावी,त्या कारवाईचे आपण उत्तर देऊ असे सांगितले.
विशेष म्हणजे शिवणकर यांनी पक्षबदलून तीन दिवसाचा कालावधी लोटल्यानंतरही भाजपच्यावतीने अद्यापही कुठलीही कारवाईसबंधी किंवा त्यांच्या निलबंनाची घोषणा का करण्यात आली नाही,हे कोडे असले तरी जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष हे सर्वसाधारण सभेत आपली भूमिका आक्रमकपणे मांडण्याची शक्यता आहे