आंतरराष्ट्रीय जलदिवसाचे आयोजन

0
6

गोंदिया-महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग,जेसीआय गोंदिया सेंट्रलच्यावतीने आंतरराष्ट्रीय जलदिवसाचे आयोजन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात सोमवारी करण्यात आले होते.कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून जेसीआयचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम मोदी उपस्थित होते.तर जिल्हा अधिकारी कर्मचारी समन्वय समितीचे सचिव दुलीचंदराव बुध्दे,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्य.अभियंता शिवकुमार शर्मा,सेंट्रल ग्राऊंड बोर्डचे माजी अधिकारी अशोक सक्सेना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी जनसामान्य नागरिकांना पाण्याचे महत्त्व आणि पाणी बचत करण्याचे उद्देश पटवून देण्यासाठी शहरात रॅली काढण्यात आली.तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले.उपस्थित पाहुण्यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.यावेळी जेसीआ़यचे अध्यक्ष गौरव बैस,तुषार शहारे,हर्ष अग्रवाल,आलोक अग्रवाल,अभियंता योगेश इंगळे,सुधीर तनखीवाले,विवेक बन्नोरे,सुरेंद्र चुनोडकर,लेखापाल विनायक कुरुमभटे,शाखा अभियंता सुनिल भांडारकर उपस्थित होते.संचालन वाटर केअर सर्विसेसचे संचालक प्रकाश शर्मा यांनी केले तर प्रास्तिवक महाराष्ट्रजीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता संजय कटरे यांनी केले.आभार विलास काळबांडे यांनी मानले.आयोजनासाठी वामनराव डेकाटे,लक्ष्मीनारायण धपाडे,राजेश मिश्रा,राजू खैरे,शालीकराम लिचडे,पवन बत्रा,अरqवद घोराडकर,शंकरलाल गौडीया,उराडे,श्रीमती रविकांता डोंगरे,राकेश चुटे,श्रीकांत धपाडे,भरत देशमुख,जयदेव कानेटकर आदींनी प्रयत्न केले.