25 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ कलापथकाद्वारे 100 टक्के मतदान जागृती अभियान

कलापथकाद्वारे 100 टक्के मतदान जागृती अभियान

0
41

अर्जुनी मोरगाव,दि.01ः-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी 100 टक्के मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पडावे व लोकशाही भक्कम करावी या उदात्त हेतूने उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो’ या अभियाना अंतर्गत जागृती कार्यक्रम अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात राबविले जात आहे.
या कार्यक्रमा अंतर्गत संपूर्ण क्षेत्रात, मतदार जागृती चे अभियान भंडारा येथील ‘असर फाउंडेशन’ च्या कलावंता मार्फत चौका चौकात राबविला जात आहे.सदर अभीयानातून मतदारांना कलावंत विबिध प्रकारच्या मनोरंजनात्मक कला दाखवून मतदारांना मतदान करण्याचे आव्हान करीत आहेत. सर्वसाधारण मतदारांपासून ते दिव्यांगणी ही मतदान करावे,न केल्यास काय नुकसान होते त्यांची माहिती कला पथाकातून दिली जाते.सदर जागृती अभियानाला प्रतिसाद मिळत आहे. यासाठी नायब तहसिलदार भणारकर, तलाठी पी.स.कुंभरे, व टीम परिश्रम घेत आहेत.

blank