परसवाडा येथे १२ जोडपी विवाहबद्ध

0
16

तिरोडा,दि.24ः-तालुक्यातील परसवाडा येथील श्री हनुमान देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजत्नत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात १२ जोडपी विवाहबद्ध झाली. यावेळी उपस्थत्नत मान्यवर व हजारो वर्‍हाड्यांनी वैवाहिक जीवनासाठी नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिला.
यावेळी आमदार विजय रहांगडाले, माजी सभापती डॉ. योगेंद्र भगत,बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामण रहांगडाले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले,भंडार्‍याचे नगराध्यक्ष सुनील मेंढे, चतुभरुज बत्नसेन, डॉ. सातपुते, मुकेश भगत, प्रेमलाल पटले, रमेश पटले, मनोहर बुद्धे, हूपराज नागरीकर, तिलक भगत, पवन पटले,पंचायत समिती सदस्य डॉ. किशोर पारधी उपस्थित होते. वाढत्या महागाईमुळे सामान्य कुटुंबांना पाल्यांचे वत्नवाह सोहळे थाटात करणे शक्य होत नाही. त्यामुळे या कुटुंबांची आर्थिक बचत व्हावी व पाल्यांचे विवाह थाटात पार पडावे, या उद्देशाने ११ वर्षांपासून श्री हनुमान देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा हिंदू पद्धतीने ११ जोडपी व बौद्ध पद्धतीने १ जोडपे विवाहबद्ध झाले. यावेळी आमदार विजय रहांगडाले यांच्यातर्फे नवदाम्पत्यांना आलमारी व पलंग भेट देण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व हजारो वर्‍हाड्यांनी नवदाम्पत्यांना वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. संचालन करून आभार डॉ. भूमेश्‍वर सोनेवाने यांनी केले.