विदर्भ राज्य आंदोलन समिती व जनमंचचे आंदोलन

0
16

वाशिम,दि.2- वेगळ्या विदर्भाबाबत जनजागृती करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती व जनमंचच्यावतीने १ एप्रिल रोजी शिवाजी चौक व पाटणी चौक येथे नागरिकांना गुलाबाचे फूल व वेगळ्या विदर्भाबाबतचे पत्रक देऊन अभिनव आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला प्रारंभ करताना प्रथम शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पदाधिकार्‍यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आंदोलनास शांततेने सुरुवात करीत समितीच्यावतीने नागरिकांना गुलाबाची फुले व पत्रक देण्यात आले. यावेळी जुगलकिशोर कोठारी व आनंद गडेकर यांनी ज्या सरकारने वेगळ्या विदर्भाचे सर्मथन नेहमी केले व तेच आज सत्तेत आले त्यांनी आपला शब्द पाळून विदर्भवादी जनतेच्या विकासासाठी वेगळय़ा विदर्भाची मागणी मंजूर करावी, अशी मागणी यावेळी केली.

आंदोलनामध्ये जनमंचचे अध्यक्ष व व्यापारी मंडळाचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, सचिव आनंद गडेकर, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व जि.प. सदस्य गजानन अहमदाबादकर, नीलेश सोमाणी, अनिल वाल्ले, संतोष व्यास, योगेश चव्हाण, जाकीरभाई ठेकेदार, अभिनेता अरविंद उचित, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष राम पाटील डोरले, जिल्हा उपाध्यक्ष पवन राऊत, युवा जिल्हाध्यक्ष नाना देशमुख, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सौरभ गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख सागर भिसडे, जिल्हा सचिव निखिल गवळी, शहर अध्यक्ष उमेश बिल्लारी, जिल्हा संपर्कप्रमुख सौरभ गंगावणे, शिवसंग्राम युवक शहर अध्यक्ष महेश इंगळे, युवक जिल्हासचिव अक्षय गोदमले, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सदस्य सागर चुंबळकर, विजय रणशिंगे, अमन अवचार, पवन गवई, अंकित वानखडे, योगेश काष्टे, अरविंद कांबळे, योगेश खंडारे, महेश तायडे, शिवम करडीले, रवि गायकवाड, श्याम घोले, शिवा वानखेडे, अनिल वानखेडे, सुनील चौले, विकी भगत, पवन राऊत आदींनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी केले.