अखेर गंगेझरी येथील हाँटमिक्स डांबर प्लाटवरील साहित्य जप्त

0
12

तहसिलदार विनोद मेश्राम यांचेकडून जप्ती कारवाई
अर्जूनी।मोर (संतोष रोकडे),दि.22ः-गोंदिया जिल्यातील अर्जूनी/मोर तालुक्यातील सोमलपूर ग्रामपंचायत अंर्तगत गंगेझरी येथील हाँटमिक्स प्रकरण गाव माझा न्युज चँनलने उजेडात आणून सामाजिक उत्तरदायित्व निभावले. अखेर अर्जूनी/मोरचे तहसिलदार विनोद मेश्राम यांनी गंगेझरी येथील सरकारी गट क्रमांक १६ वर अनाधिक़ुतरित्या सिंधी काँलनी गोंदिया येथील फत्तेसिंह राणाप्रताप चोहाण यांचे असलेले विविध प्रकारचे साहित्य दि २० मेच्या सायंकाळी सहा च्या सुमारास जप्त केले. या जप्ती कारवाईच्या वेळी सरपंच लिलेश्वर खुणे.ग्रामसैवक एल एन ब्राम्हणकर.संगणक परिचालक थानेश्वर ठाकरे.गोपाल धिरवानी उपस्थित होते.
या तप्ती साहित्यामध्ये एक बारा चक्का ट्क नंबर एम एच ३१ सि क्यु ६०२९ .एक टिप्पर १० चक्काक़मांक एम एच ४० वाय ९५३३ ;एक जे सी बी मशिन एम एच ३५ जी ५२११ .एक मोठा जनरेटर.एक मोठी हाँटमिक्स मशिनरी अँपल कंपनी एम सी नंबर १०७ वर्ष २०१९ माँडेल डी एम ५० कँपिशिटी ६०-९० ;एक मोठा टिनाचा शेड अंदाजे १२×२२ =१४४ चौ फुट .डांबर असलेले १४० ड्म .जलाऊ लाकडे अंदाजे १४ बिट्टया. एक मशिन.आँपरेटरकरिता मशिन कंट्टोल रुम कँबिन .एक हातपंप व हातपंपाला इलेक्ट्टीक मोटार.२७ आंबा झाडे.पळसाची ७ झाडे.नव सागवान झाडे.१जांभूळ झाड.२७ आंजनाची झाडे।. एक जांभळाचे झाड एवढे साहित्य जप्त केले आहे हे जप्त केलेले साहित्य आदेशानुसार सांगितलेल्या ठिकाणी आणून देण्याच्या अटीवर फत्तेसिंह राणाप्रताप चोहाण यांच्या सुपुर्द करण्यात आले आहे