जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक, पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर,२३ जून रोजी होणार मतदान

0
40

वाशिम, दि. २2 : राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील ईलखी ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम तसेच ३३ ग्रामपंचायतींच्या सरपंच, सदस्य पदाच्या रिक्त जागांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सार्वत्रिक व पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यत अस्तित्वात राहणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठे करता येणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने सूचित केले आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार २२ मे २०१९ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. सार्वत्रिक निवडणूक व पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र ३१ मे ते ६ जून २०१९ या कालावधीत सकाळी ११ वाजतापासून ते दुपारी ३ वा. दरम्यान स्वीकारले जाणार आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी ७ जून २०१९ रोजी सकाळी ११ वाजतापासून सुरु होईल. १० जून  २०१९ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. त्याचदिवशी दुपारी ३ वा. नंतर निवडणूक चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. आवश्यकता असल्यास २३ जून २०१९ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा. पर्यंत मतदान घेण्यात येईल. मतमोजणी २४ जून २०१९ रोजी होईल व २७ जून २०१९ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

थेट सरपंच निवडीसाठी पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती

जिल्ह्यातील ५ ग्रामपंचातींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील गोंडेगाव,रिसोड तालुक्यातील घोन्सर, मंगरूळपीर तालुक्यातील वसंतवाडी, मानोरा तालुक्यातील खांबाळा, कारंजा तालुक्यातील झोडगा बु. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सदस्य पदासाठी पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती

            राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार वाशिम तालुक्यातील बोरी, गोंडेगाव, पंचाळा, सुपखेला, ढिल्ली, कळंबा महाली, रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द, दापुरी खु. केशवनगर, मांडवा, रिठद, करंजी, मालेगाव तालुक्यातील शेलगाव बोंदाडे, रिधोरा, गांगलवाडी, डोंगरकिन्ही, मंगरूळपीर तालुक्यातील पार्डीताड, भडकुंभा, निंबी, रामगड, कारंजा तालुक्यातील उंबर्डाबाजार, धनज बु., अंतरखेड, भुलोडा, डोंगरगाव, महागाव, मानोरा तालुक्यातील गादेगाव, अभई खेडा, देवठाणा या ग्रामपंचायतींमध्ये रिक्त सदस्य पदांसाठी पोट निवडणूक होत आहे.