भंडारा-गोंदिया लोकसभा मतमोजणीची रंगीत तालिम यशस्वी

0
24

Ø  प्रत्येक विधानसभानिहाय 14 टेबल
Ø  आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल

भंडारा,दि. 21 :- 11-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची मतमोजणी 23 मे रोजी लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयात होणार असून मतमोजणीची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.  आज 21 मे रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली. ती यशस्वीपणे पार पडली आहे. यावेळी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भुसारी,
सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, मनिषा दांडगे, शिल्पा सोनाले, मुकूंद टोणगावकर,अनंत वालस्कर, जी.एन. तळपदे उपस्थित होते.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी प्रत्येकी 14 टेबल असणार आहेत. रंगीत तालीम मध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रात मतमोजणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्या-त्या विधानसभा क्षेत्राच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतमोजणी, डाटा अपलोड, ऑनलाईन फीडींग व मॅन्युअल डाटा फीडींग याबाबतचे यशस्वी प्रात्यक्षिक केले. यावेळी मतमोजणी
पर्यवेक्षक व सहाय्यक आपआपल्या टेबलवर हजर होते.
तुमसर विधानसभा मतदार क्षेत्राची मतमोजणी लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाच्या रुम नं. 15, भंडारा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी रुम नं. 11, साकोली विधानसभा क्षेत्राची मतमोजणी रुम नं. 12, अर्जूनी मोरगाव विधानसभा क्षेत्राची मतमोजणी रुम नं. 14, तिरोडा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी रुम नं. 10,गोंदिया  विधानसभा क्षेत्राची मतमोजणी रुम नं. 16 मध्ये होणार आहे. 11 एप्रिल रोजी भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातील एकूण 18 लाख 8 हजार 734 मतदारांपैकी 12 लाख 34 हजार 896 मतदारांनी मतदान केले मतदानाची टक्केवारी 68.27 एवढी आहे.
मतमोजणीसाठी मतमोजणीच्या ठिकाणी चोख बंदोबस्त राहणार असून 22 मे 2019 पासून हा परिसर सुरक्षा यंत्रणा ताब्यात घेणार आहे. यासाठी 390 पोलीस अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे दोन प्रशिक्षण पार पडले आहे.
ज्यांना मतमोजणीचे प्रवेशपत्र देण्यात आले अशा अधिकारी कर्मचारी व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मतमोजणी परिसरात मोबाईल, पेनड्राईव्ह, कॅमेरा तथा इलेक्ट्रानिक्स डिव्हाईस सोबत घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. लालबहादूर शास्त्री शाळा परिसरातील रस्तत्यावरील वाहतूक 22 व 23 मे 2019 इतरत्र वळविण्यातआली आहे. मतमोजणीच्या दिवशी नागरिकांनी लाल बहादूर
शास्त्री शाळेच्या परिसरात गर्दी करु नये, असे आवाहन प्रशासनाने केले