अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षण वर्गात सुविधांचा अभाव,प्रशिक्षणाचा निधी खिश्यात

0
40
गोंदिया(खेमेंद्र कटरे)दि.22-अनागोंदी, बेशिस्त, नियोजनशून्यता, असंवेदनशीलता आणि साध्या पण व्यावहारिक माणुसकीबद्दल बेपर्वाई हे जिल्ह्यात पार पडलेल्या अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमातून अनुभवास आले.या प्रशिक्षणातील गैरसोयीमुळे अंगणवाडी सेविकांच्या संतापला तीव्र धार होती, कारण त्यांना तर अनंत गैरसोयी सहन कराव्या लागल्या.शासन लाखो रुपये या प्रशिक्षणासाठी जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकाèयांना देते.परंतु अधिकारी स्वतःथंडगार एसी व कुलरचा हवा घेत कार्यालयात बसून गप्पा हाकण्याचेच काम करत,प्रशिक्षणासाठीचा निधी खर्च करण्यापेक्षा तो खिश्यातच घालण्याचा प्रकार जिल्ह्यात सुरु असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात बघावयास मिळाला.कुठे नास्त्यावर तर कुठे स्वतःचा टिपीन मधील जेवण घेऊनच भूख भागवण्याची वेळ आली.जेव्हा की जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्यावतीने मार्च महिन्यातच यासाठीचा निधी संबधित सीडीपीओंना बीडीएस करण्यात आल्याचे सांगण्यात आले असताना निधी नसल्याचे कारण पुढे का करण्यात येत आहे,हे कळेनासे असून या प्रशिक्षणातून गैरव्यवहाराचा मार्ग तर स्विकारला गेला नाही ना अशा शंकाना बळ आले आहे.
.गोंदिया जिल्ह्यातील ८ ही तालुक्यात मोबाईल कॉमन अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅपच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रशिक्षणस्थळी रखरखत्या उन्हाळ्यात ज्या सोयीसुविधा असायला हव्या होत्या.त्या कुठल्याही दिसून आल्या नाही.उलट अधिकारी त्या सुविधा पुरविण्याएैवजी ज्यांना कंत्राट दिले त्यांच्याकडील कुलर हे लग्नकार्यक्रमात असल्यामुळे त्यांनी लावले नाही असे सांगत बाजू झटकण्याचा प्रयत्न करताना दिसून आले.
जेव्हा की याच गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत गेल्या सहा-सात वर्षापूर्वी प्रशिक्षणातील गैरसोयीमुळे एका शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागला होता.त्यापासून या जिल्हापरिषदेच्या अधिकाèयांनी धडा घ्यायला हवा होता.मात्र जिल्हा महिला बालविकास प्रकल्प विभागाच्यावतीने तालुकास्तरीय एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयांना प्रशिक्षण घेण्याचे निर्देश देत त्यांना त्यासाठी लागणारा पैसा सुद्धा दिला.परंतु तालुकास्तरावरील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाèयांना हे प्रशिक्षण घेताना सध्याचा काळ कसा आहे याची जाणीव का झाली नाही की जाणीव पुर्वक त्यांनी असे केले कळायला मार्ग नाही.
गोंदिया येथील मनोहर म्युनिसिपल हायस्कूल येथे गेल्या दोन दिवसापासून अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण दिले जात आहे.त्यापूर्वी १६ व १७ मे रोजी प्रशिक्षण पार पडले.त्यावेळी सुद्धा या शाळेतील ज्या वर्गखोलीत प्रशिक्षण दिले जात आहे,त्याठिकाणी कूलरची व्यवस्थाच केली नाही.जे पंखे वर्गखोलीत आहेत.त्या पंख्याच्या हवा कुणालाच लागत नाही तर काही बंद पडले आहेत.तीच परिस्थिती देवरी येथील प्रशिक्षण केंद्रावर होती.देवरीत अंगणवाडी सेविकांना बसायला खुच्र्या सुध्दा पुर्ण उपलब्ध झालेल्या नव्हत्या.गोंदियातील केंद्रावर सकाळी १० वाजेपासून प्रशिक्षण सुरू होत असताना प्रशिक्षणार्थी अंगणवाडी सेवकांसाठी पाण्याची सोय मात्र ११.३० ते १२ वाजता करण्यात येत असल्याची कबुली खुद्द पुरवठादाराने केली.तर जे जेवण प्रशिक्षणाथ्र्यांना दिले जात आहे,त्या जेवणातही कुठलाच स्वाद नसल्याचे प्रशिक्षणाथ्र्यांनी सांगितले.तर देवरीत मात्र जेवणाएैवजी नास्त्यावरच बोळवण करण्यात आली.
रखरखत्या उन्हामुळे गोंदियात प्रशिक्षणाला आलेल्या अंगणवाडी सेविकापैकी तेढवा येथील सुनीता पटले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी डॉक्टरकडे हलविण्यात आले.तर प्रशिक्षण वर्गात असलेल्या बिरसोला येथील रूपाली तुरकर,ब्राम्हणटोला येथील प्रेमलता पाचे,कासा येथील अल्का मिश्रा,काटी येथील रश्मी मते यांच्यासह अनेक अंगणवाडी सेविकांची प्रकृती वर्गातील उष्णतेमुळे खालावल्याचे चित्र बघावयास मिळाले,प्रशिक्षणार्थी अंगणवाडीसेविकांनी तर समस्यांचा पाडाच बेरार टाईम्सकडे वाचला.विशेष म्हणजे या सर्व प्रशिक्षणाच्या देखरेखीसाठी मुंबई आयुक्तस्तरावरुन स्वच्छ भारत प्रेरक म्हणून ज्यांची नेमणूक केली त्या प्रियांका टोटरे या सोमवारला तिरोडा येथील प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी गेल्या असता त्यांना तिथे जेवणामुळे विषबाधा झाल्याने त्या मंगळवारला गोंदिया कार्यालयातच आल्या नसल्याचे जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागातील कर्मचाèयांनी सांगितले.तर ज्या अंगणवाडी सेविका आपले उच्चशिक्षण पूर्ण करण्यासाठी शिक्षण घेत आहेत त्यापैकी काहींचा पेपर असतानाही त्यांना मात्र सुट्टीच देण्यात आले नसल्याचेही समोर आले.
देवरी तालुक्यात ज्याठिकाणी प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे,त्याठिकाणी योग्य बसण्याचीही सोय नाही.तर जेवणाएैवजी त्यांना नास्ता देऊनच शांत करण्यात आले.अर्जुनी मोरगाव तालुक्यात तर यापेक्षाही वाईट अवस्था अशी की सीडीपीओ कार्यालयाने अंगणवाडी सेविकांनाच स्वतःचा टिपीन सोबत आणायला सांगितले.शासन जर चहा,नास्ता,जेवणाचे पैसे देत असेल तर हा पैसा योग्यप्रकारे का खर्च केला गेला नाही अशी टिका होऊ लागली आहे.हीच स्थिती आमगाव येथील प्रशिक्षणातही होती.त्याठिकाणी सुध्दा सुविधांचा अभाव असल्याचे सांगण्यात आले.
यानंतरच्या प्रशिक्षणात सुविधा पुरवू
यासर्व प्रशिक्षण केंद्रातील गैरसोयी व सुविधांबद्दल गोंदियाचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी राजेश वाघ यांना विचारणा केल्यावर त्यांनी मात्र निधीचा अभाव त्यातच ज्यांना कंत्राट दिले त्यांच्याकडे कुलरचा अभाव असल्याने व्यवस्था होऊ शकली नाही असे सांगत यानंतर होणाèया प्रशिक्षणाच्यावेळी सर्व सुविधा पुरविल्या जातील असे सांगितले.तर देवरी येथील प्रभारी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी पांडे यांनी निधी नसल्यामुळे सुविधा पुर्ण उपलब्ध झाल्या नाहीत असे सांगितले.