११ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू

0
13

 अर्जुनी मोरगाव,दि.21ः- तालुक्यात एक सरपंच व २१ ग्रामपंचायत सदस्य निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
तालुक्यातील गौरनगर ग्रामपंचायतीत ३ सदस्यांसाठी पोटनिवडणूक होत आहे. अरुणनगर ग्रामपंचायतीत २ सदस्य व १ सरपंच, दिनकरनगर ग्रामपंचायत २ सदस्य, जाणवा ग्रामपंचायत १ सदस्य, महागाव ग्रामपंचायत ७ सदस्य. बोंगगाव/सुरबन, गुढरी प्रतापगड, बोंडगावदेवी, नवेगावबांध, कुंभीटोला या ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी एक सदस्य पदासाठी पोटनिवडणूक होणार आहे. १९ जून पासून उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरु झाले असून २0 जून रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी व २२ जूनला उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहेत. तर ५ जुलैला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजतापयर्ंत मतदान होणार असून ६ जुलैला मतमोजणी होईल.
महागाव, अरुणनगर, दिनकरनगर या ग्रामपंचायतींसाठी एम.एच.मुनेश्‍वर व एस. बी गौरकर तर प्रतापगड, बोंडगावदेवी, नवेगावबांध व कुंभीटोला या ग्रामपंचायतींसाठी आर.पी. रामटेके व एस. सी. हरिणखेडे व गौरनगर, जाणवा, बोंडगाव सुरबन, गुढरी या ठिकाणी सी. बी. सिंधराम व आर. आर. कनोजकर यांची निवडणूक अधिकारी व सहाय्यक म्हणून काम करीत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार विनोद मेश्राम व नायब तहसिलदार सुनील भानारकर काम पाहत आहेत.