मंजूर तलाठी कार्यालत त्वरित सुरु करा-मोरेश्वर कटरे

0
8

गोरेगाव,दि.३ जुलै: शासनाने महसूल विभागात सुधारणा करण्याकरिता तसेच सर्व सामान्य नागरिक व शेतकèयांना शासकीय योजनांचा लाभ वेळेवर मिळावा याकरिता महसूल मंडळासह तलाठी सांझामध्ये वाढ केली. गोरेगाव तालुक्यात ६ नवीन तलाठी कार्यालयाला २४ ऑगस्ट २०१७ रोजी मंजूरी देण्यात आली. दोन वर्षाचा कार्यकाळ लोटूनही जिल्हाधिकारी कार्यालयाने अद्यापही या सहा ही ठिकाणी स्वतंत्र तलाठी न दिल्याने हे कार्यालये सुरु होऊ शकली नाही. त्यातच प्रधानमंत्री कृषी सम्मान योजना, कर्ज माफी योजना, विद्याथ्र्यांचे प्रमाणपत्र, सातबारा, फेरफार आदि कामाकरिता सर्व सामान्य नागरिक, विद्यार्थी व शेतकèयांना त्रास करीत लागत असल्याने जिल्हाधिकारी यांनी यकडे त्वरित लक्ष देऊन स्वतंत्र तलाठी कार्यालय सुरु करावे अशी मागणी माजी कृषी व पशु संवर्धन सभापती मोरेश्वर कटरे यांनी केली आहे. सहा नवीन तलाठी कार्यालय मंजूर करण्यात आले. त्यामध्ये घोटी, हिरडामाली, निंबा, बाम्हणी, चिचगावटोला व बोळूंदा या गावांचा समावेश आहे. चिचगावटोला येथील तलाठी कार्यालयाला चिचगाव, चिचगावटोला, सिलेगाव व बाघोली ही गावे जुडली असून हिरडामाली येथील तलाठी कार्यालयाला मोहगाव व धुंदाटोला, निंबा येथील तलाठी कार्यालयााला हलबीटोला, चिचटोला, बाम्हणी, चांगुटोला व कन्हारटोला तर बोळुंदा तलाठी कार्यालयाला बोळुंदा, आलेबेदर, आसलपानी व तिमेझरी गावे जोडली गेली आहेत. मात्र गेल्या दोन वर्षापासून ही कार्यालये सुरु न झाल्याने नागरिकांना १० ते १५ किमी अंतरावर जावून तलाठी कार्यालयाच्या चकरा मराव्या लागतात.