आज आमगाव येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळावा

0
11

आमगाव,दि.३ जुलै: महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती आणि नियोजन विभाग यांच्या संयुक्त वतीने आमगाव तालुक्यातील माविमच्या बचतगटातील महिलांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन ३ जुलै २०१९ रोजी लक्ष्मणराव मानकर फार्मसी कॉलेज, आमगाव येथे सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.
मेळाव्याचे उदघाटन आमदार संजय पुराम हे करतील. अध्यक्षस्थानी माजी आमदार केशवराव मानकर हे असतील. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.माजी सभापती सविता पुराम, पं.स.सभापती वंदना बोरकर, उपसभापती जयप्रकाश शिवणकर, जि.प.सदस्य उषा मेंढे, सुरेश हर्षे, जियालाल पंधरे, राजेश भक्तवर्ती, शोभेलाल पटले, तहसिलदार दयाराम भोयर, गटविकास अधिकारी चंद्रकांत सावळे, तालुका कृषि अधिकारी पी.पी.मुंढे, मुद्रा बँक समन्वय समितीचे सदस्य धनंजय वैद्य, अमृत इंगळे, नंदकिशोर साखरे, हिवराज देशमुख, तर मार्गदर्शक म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अग्रणी जिल्हा प्रबंधक आनंदराव वासनिक, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, हिवरा कृषि विज्ञान केंद्राचे एन.एस.देशमुख, आर्थिक साक्षरता केंद्र प्रमुख आर.के.पहिरे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके यांची उपस्थिती राहणार आहे.
तरी आमगाव तालुक्यातील बचतगटांच्या महिलांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे व स्वावलंबन लोकसंचालित साधन केंद्र आमगावच्या अध्यक्ष शांता चंद्रिकापुरे यांनी केले आहे.