‘जलसमाधी’ च्या तयारीत असलेले ‘रेंगेपार’ गाव

0
14

तुमसर,दि.03-भंडारा जिल्ह्यातील तुमसर ताल्नयात वैनगंगा नदीच्या काठावर असलेला रेंगेपार हे गाव पुनर्वसनाच्या गेल्या अनेक वर्षापासून लढा देत आहे.मात्र त्यांच्या लढाईकडे शासन प्रशासनाचे दुर्लक्षच असल्याने गावकर्यानी पुन्हा ‘जलसमाधी‘ च्या तयारीला सुरवात केली आहे. रेंगेपारवासियांनी केलेली मागणी ही रास्त आहे. नदीने आपला पात्र बदलला आणि हळूहळू अर्धा गाव त्यात समाविष्ट झाला. नदीला लागून असलेली दलित वस्तीची संपूर्ण घर, अनेक हेक्टर सुपीक शेतजमिन आणि काठावर असलेली जवळपास सर्वच घर जमिनदोस्त होऊन नदीत विलीन झाली. आणि गोरगरिबांच्याह्नकासाठी गावाच्या पुनवर्सनाची लढाई सुरू झाली. पण लाढाईच्या खंबीर नेतृत्व नसल्याने १9८० पासून ची रास्त मागणी सरकार दरबारी थंड्या बस्त्यात जमा होती.

कालांतराने गावाला तरूण युवकांच्या नेतृत्त्व लाभला आणि शिवा-हिरालालची जोडी संपूर्ण गावकèयांच्या सहकार्याने पुढे आली. एक सरपंच तर दुसरा सदस्य झाला आणि खèया अर्थात त्या गावाच्या पुनवर्सनासाठी संघर्ष सुरू झाला. अनेक आंदोलने झाली. सत्ताधारी विरोधात आले आणि विरोधात असलेले सत्ताधारी बनले मात्र आजही पुनवर्सनाची मागणी जशीच्या तशीच कायम आहे. त्यात एक बदल जरूर झाला. नदीच्या काठावर असलेल्या ८४ कुटूंबाला स्व. अनंतलाल नागपूरे व श्री. दिवे यांच्या मालकीच्या दोन हेक्टर शेतजमिन सरकार ने अधिग्रहीत करून खाली भुखंड दिले. त्याच जागेवर नागरिक सुविधा सहित गावातील पिढीतांच्या पुनवर्सन करा ही मागणी कायमची अपुरी राहिली पण लढाईच्या दण्नयात जवळपास ७५ कुटूंबाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल निधी मिळाली आणि आज त्या ठिकाणी सुंदर वस्ती निर्माण झाली. पण गावाची समस्या मात्र सुटलेली नाही.

नदीच्या काठालागून असलेला गावाचा मुख्य रस्ता आता जीवघेणा बनला आहे. नदीचे पात्र तिव्र गतीने खचून आता मुख्य रस्त्याला गिळंकृत करण्याची भयावह स्थिती झाली. फ्नत काही दिवसातच आता रस्ता दुभागलं जाणार आहे. पावसाच्या पहिल्याच हलका दणका बसला तर ही स्थिती निर्माण झाली. पुढे काय होणार भगवान जाणे, पण यामूळे संपूर्ण गावकरी दहशतीत असून दररोज रात्र जागून काढत आहेत. जीव मुठीत घेऊन गावकरी गंभीर समस्याशी झुंजत असतांना प्रशासन मात्र उदासीन असल्याचे आज पर्यंतचे चित्र आहे.