माऊंट आबु अभ्यास दौरा खर्चाची देयके दोनवर्षापासून बेपत्ता

0
33

गोंदिया,दि.03- जिल्हा परिषदेच्यावतीने दोन वर्षापूर्वी म्हणजे ३० जुर्ले रोजी २८ जिल्हा परिषद सदस्यांची सहल अभ्यास दौèयाच्या नावावर तत्कालीन महिला बालकल्याण सभापतींच्या आग्रहाखातर आयोजित करण्यात आली होती.त्यासाठी नागपुरातील कौशल्या एंटरप्रायझेस नावाच्या कंपनीला सहलीचे कंत्राट देण्यात आले होते.परंतु त्या कंपनीने आणि ज्यांच्यावर जबाबदारी सोपविली होती त्यांनी अद्यापपर्यंत या सहलीवर खर्च झालेल्या ४ लाख ४० हजार रुपयाच्या खर्चाचे देयकेच सादर न केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.विशेष म्हणजे तत्कालीन महिला सभापतींचा या सहलीसाठी एवढा आग्रह होता की त्यांनी इतर सर्व विषय समित्यांकडे असलेल्या अभ्यास सहलीचा पैसा सुद्धा आपल्या विभागाकडे वित्तविभागाच्या संमतीने वळता करून घेतला होता.
शासकीय नियमानुसार खर्चासाठी ५० टक्के qकवा त्यापेक्षा अधिक रक्कम द्यावी लागते मात्र तत्कालीन महिला बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पारखे यांनी महिला बालकल्याण सभापती व जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दबावात पूर्ण रक्कमेचे धनादेश सहलीसाठी दिले.त्या दिलेल्या धनादेशाचे उपयोगिता प्रमाणपत्र आजपर्यंत कौशल्या एंटरप्रायझेस आणि ज्यांना या सहलीसाठी नेण्यात आले होते त्या विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे यांच्याकडून अद्यापही संबंधित विभागाला खर्चाचे देयके सादर न झाल्याने या सहलीच्या निधीखर्चात कुठे तरी गैरव्यवहाराची शंका निर्माण झाली आहे.संबंधित विभागाने यासाठी संबंधितांना वारंवार पत्र देऊन खर्चाचे देयके मागितले परंतु त्यांच्याकडून या दोन वर्षात एकही देयके सादर करण्यात आलेले नाही.
त्यातच ही सहल जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सभापती यांच्यासाठी असताना काही पदाधिकाèयांनी मात्र सहकुटुंब या सहलीचा आस्वाद घेतल्याचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झालेले होते.सहल जाण्यापूर्वी या विषयाकडे बेरार टाईम्सने सातत्याने लक्ष वेधले होते,परंतु तत्कालीन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी जाणीवपूर्वक काणाडोळा याकडे केल्याने आणि तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षांनी सर्व विभागाचा निधी एकत्र करण्यासोबतच संपूर्ण रकमेचा धनादेश देण्यासाठी संबंधित विभागावर टाकलेल्या दबावामुळे अभ्यास दौèयाच्या नावावर सहलीसाठी पैसा दिला गेल्याचे संबंधित विभागाचे म्हणणे आहे.गेल्या दोन वर्षापासून ४ लाख ४० हजार रुपयाच्या खर्चाचा हिशोब अद्यापही सादर न झाल्यामुळे यावर्षीच्या जागतिक महिला दिन कार्यक्रमासाठी या विभागाला पैसे मिळू शकले नव्हते हे तेवढेच सत्य आहे.
स्वतःच्या हौसेसाठी तत्कालीन काँग्रेसच्या पदाधिकाèयांनी केलेल्या चुकांचे डोंगर आता फुटू लागले असून अभ्यास सहल खर्च प्रकरणात विधानमंडळाचे लोकलेखा समितीचे अध्यक्ष असलेले काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल हे सुद्धा तत्कालीन महिला बालकल्याण विभागाच्या सभापतींचा बचाव करीत असल्याची चर्चा एैकावयास मिळत आहे.यासर्व प्रकरणाकडे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देत तत्कालीन महिला बालकल्याण विभागाच्या सभापतीसह तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर या सर्व प्रकरणाची जबाबदारी निश्चित केल्याशिवाय या खर्चाचा ताळमेळ या विभागाला मिळणार नाही,अन्यथा देयकासाठी गेल्या दोनवर्षापासून सुरू असलेली टोलवा टोलवी पुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे.
त्या अभ्यास सहलीसाठी पाच विषय समित्याकडे असलेला दोन वर्षाचा निधीचे नियोजन करून ते महिला बालकल्याण विभागाला वळते करण्यात आले होते.यात एका विषय समितीचे दोन वर्षाचे ८० हजार रुपये असे ५ विषय समित्यांचे ४ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. ५३ जिल्हा परिषद सदस्यांपैकी २८ जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकारी यांच्यासोबत शासकीय प्रतिनिधी म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे अशा २९ जणांचा हा अभ्यास दौरा ३० जुर्ले ते ५ ऑगस्ट २०१७ दरम्यान आयोजित करण्यात आलेला होता.या दौèयासाठी विस्तार अधिकारी खोब्रागडे यांना १ लाख ४५ हजार रुपये खर्चासाठी देण्यात आले होते.तर कौशल्या एंटरप्रायजेसला २ लाख ९० हजार रुपयाचा धनादेश अग्रिम देण्यात आलेला होता.या सहलीत एकही पंचायत समितीच्या सभापतींचा सहभाग नव्हता.
कृषी विभाग, महिला बालकल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग व समाजकल्याण विभागातर्गंत विषय समिती सदस्यांसह उत्कृष्ट शेतकरी यांना या अभ्यास दौèयात सहभागी केले जाते.हा दौरा महाराष्ट्र राज्यासाठी असतो,त्यावर जिल्हानिधीतून खर्च केला जातो.पाच विषय समित्यासांठी वर्षाकाठी ४० हजार रुपये अभ्यास दौèयासाठी मंजूर केले जातात.यापूर्वी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जे अभ्यासदौरे आयोजित करण्यात आले होते,ते केरळ,राजस्थान आणि विशेष म्हणजे देशाबाहेर नेपाल ला सुद्धा एका कार्यकाळात अभ्यास दौरा गेलेला होता.

महिला व बालकल्याण समिती सदस्यांचा दौèयात ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हाषदेमध्ये निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींचे पंचायत राज, आदर्श ग्राम, निर्मल ग्राम, महिला बळकटीकरण, महिला व विकासाचे उपक्रम इ विषयाची माहिती घेण्यासाठी अभ्यास दौरे आयोजित करावे असे म्हटले आहे. परंतु ङ्मा सहलीत पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या सदस्यांना महिला बालकल्याणच्या अभ्यास दौèयात स्थान मिळालेले नाही. पशुसर्वंधन समितीच्या सदस्यांसह उत्कृष्ट गोपालक व कृषी समितीच्या सदस्यांसह उत्कृष्ट शेतकèयाचा समावेश त्या अभ्यास दौèयात असायला पाहिजे.परंतु या अभ्यास दौèयाकडे बघितल्यास त्यांच्याएैवजी दुसरेच सदस्य सहभागी झाल्याचे दिसून आले.तत्कालीन शिक्षण सभापती,विरोधी पक्षाचे गटनरेते ङ्मांच्ङ्मासह काँग्रेस व राष्ट्रवादीचे काही सदस्ङ्म सोडून बहुतांश जि.प.सदस्य हे कुटुंबासह सहभागी झाले होते.