नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावर ओबीसी सेवा संघाचा आक्षेप

0
15

भंडारा,दि.05ः– कस्तुरीरंगन समितीने केंद्र सरकारला राष्ट्रीय शिक्षण निती २०१९ संबंधाचा अहवाल दिला आहे. या मसुदयात नविन शिक्षण धोरणाने मुलभूत परिवर्तन होण्याची वारंवार सांगण्यात आले आहे. परंतू वर्तमान शिक्षण प्रणाली संबंधाने टिका व विश्लेषणाचा अभाव दिसून येत आहे. दबावात थोडयाफार चुकांवर चर्चा करण्यात आली आहे. वर्तमान शिक्षण धोरणावर स्पष्ट टिका व चर्चात्मक विश्लेषण केल्याशिवाय मुलभूत परिवर्तनकसे होणार, असा प्रश्न उपस्थित करीत विविध मागण्यांचे निवेदन ओबीसी सेवा संघाचे वतीने जिल्हाधिकाèयांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. सदर शिक्षण धोरण नागरिकांना शिक्षणाच्या बाहेर करण्याचे घोषणापत्र आहे. लोकशाहीला बाजुला सारत लोकांच्या प्रतिक्रीया घेण्याचे नाटक सरकार करीत आहे. याचा विरोध ओबीसी सेवा संघ, ओबीसी महिला सेवा संघ, ओबीसी विदयार्थी सेवा संघ, तसेच गैर राजकीय संघटनांनी केला आहे.