राज्यमंत्री फुकेंच्या निधीतून शिक्षक काॅलनीत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

0
18

गोंदिया,दि.०५ः-डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक कर्मचारी गृहनिर्माण सहसकारी संस्थेतंर्गत कॉलनीमध्ये सार्वजनिक बांधकाम,वन व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या स्थानिक विकास निधीतून रस्ता बांधकाम व सौदर्यीकरण कामाचे भूमिपूजन कुडवाच्या सरपंच शामदेवी जुगलकिशोर ठाकरे यांच्या हस्ते संदीप कडुकर,रेखा बिसेन,प्रकाश ढोमणे,कुणाल बिसेन,प्रदिप ठाकरे,लिमेंद्र बिसेन,रुद्रसेन बिसेन सेवानिवृत्त प्राचार्य पी.एफ.बघेले यांच्या उपस्थितीत करण्यात आले.सुमारे २१ लाख रुपयाच्या निधीतून सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.या रस्ता बांधकामासाठी विनोद अग्रवाल,मनिष अग्रवाल,आर्किटेक्टर संदीप बघेले यांनी निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले.यावेळी संस्तेचे अध्यक्ष एन.एफ.रहागंडाले,सचिव यु.सी.रहागंडाले व संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.