राष्ट्रीय बाल हक्क समिती गडचिरोली जिल्हयात दाखल

0
8

गडचिरोली,दि.१८:- नागपुर विभागातील सहाही जिल्हयातील बाल हक्क विषयक सुनावणी आयोगाचे सदस्य गडचिरोलीत दाखल झाले आहेत. समिती प्रमुख दि. १९ जुलै रोजी सकाळी येणार आहेत.  जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व इतर विभाग प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर समिती सदस्यांनी सामाजिक संस्थांशी बैठक घेतली.
गडचिरोली येथे १९ जुलै रोजी बाल हक्क व संरक्षणाबाबत विविध तक्रारींवर जनसुनावणी होणार आहे. गडचिरोली येथे होणारा हा भारतातील ९ वा बेंच (सुनावणी) आहे. यावेळी आयोगाचे सदस्यांनी सामाजिक संस्थांना तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केले. यावेळी ते म्हणाले की कोणत्याही संस्थेचे नाव किंवा ओळख उघड न करता सुनावणी प्रक्रिया घेतली जाणार आहे. या दाखल झालेल्या आयोगाच्या गटामध्ये सुदीप चक्रवर्ती, शक्ती सिंह, अभिकर्ष त्यागी आणि निखिल कुमार हे सदस्य आहेत.
१८ जुलै रोजी दुपारी १.०० वा. आयोगाचे अधिकारी बाल हक्क व संरक्षण विषयक संबंध येणाऱ्या विविध विभागप्रमुखांशी बैठक घेणार आहेत. यानंतर दिनांक १९ जुलै रोजी सकाळी ९.०० वा. आयोगाचे स्वागत जिल्हाणिकारी आवारात लेझिम पथकाद्वारे केले जाणार आहे. स्वागतानंतर लगेच आयोगाचे सदस्य पत्रकार परिषद घेणार आहेत. सकाळी ९ .४५ वा. होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये आयेग आयोगाचा उद्देश माध्यामांना सांगणार आहेत तसेच माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. त्यानंतर सकाळी १०.०० वाजले पासून जिल्हानिहाय सुनावणीला सुरूवात होणार आहे. राष्ट्रीय बाल हक्क व संरक्षण आयोगासमोर तक्रारी दाखल करण्याची सुरुवात नवीन नियोजन भवन, गडचिरोली येथे सकाळी ९.०० वाजले पासून सुरु होत आहे.
आजच्या बैठकीमध्ये सामाजिक संस्थांना तक्रारी दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावेळी संस्थांच्या शंकांचे निरसन आयोगाच्या सदस्यांमार्फत करण्यात आले.