हेक्टरी साडेसात हजार सानुग्रह अनुदान द्या

0
13

गोंदिया : धान उत्पादक शेतकर्‍यांच्या धानाचे भाव वाढवून देण्यात यावे व प्रतिहेक्टर सात हजार ५00 रुपये सरसकट सानुग्रह अनुदान देण्याची मागणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धान उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्येबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी शिष्टमंडळात प्रामुख्याने खा. अशोक नेते, जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, आ.विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, माजी आ. केशवराव मानकर, माजी आ.दयाराम कापगते, प्रदेश सदस्य राकेश शर्मा, जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण, वीरेंद्र अंजनकर, दीपक कदम, जयंत शुक्ला, कलाम शेख, झामसिंग येरणे, प्रमोद संगीडवार, खेमराज लिल्हारे, प्रदीपसिंग ठाकूर, चामेश्‍वर गहाणे, घनश्याम पानतवणे, प्रवीण दहीकर, शिव शर्मा आदींचा समावेश होता. पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात धान हे मुख्य पीक आहे. मात्र काही वर्षापासून धान उत्पादक शेतकरी अतवृष्टी, गारपीट, दुष्काळ अशा अनेक संकटांमुळे सततच्या नापिकीने त्रस्त आहे.त्यातच विविध कारणाने धानाचे उत्पादन मूल्य वाढत असल्याने, शासनाकडून धानाला मिळणारा आधारभूत भाव पूरेसा नाही. त्यामुळे धान उत्पादक शेतकर्‍यांच्या धानाला भाव वाढवून देण्यात यावे. तसेच मोबदला म्हणून शेतकर्‍यांना सरसकट प्रति हेक्टर सात हजार ५00 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी धान उत्पादक शेतकर्‍यांनी निराश होण्याची गरज नसून लवकरच धानासंदर्भात योग्य व सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्‍वासन दिले.