जिल्हाध्यक्ष निवडीचे अधिकार पटेलांना

0
5

गोंदिया : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घोषित संघटनात्मक निवडणुकीच्या कार्यक्रमांतर्गत जिल्हाध्यक्षांची निवड करण्याचे सर्वाधिकार खासदार प्रफुल्ल पटेल यांना देण्याबाबतचा ठराव शनिवारी (दि.११) बैठकीत घेण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष व जिल्हा कमिटीची निवडणूक घेण्यासाठी शनिवारी (दि.११) बैठक घेण्यात आली.सभेला माजी मंत्री अनिल देशमुख, आ.राजेंद्र जैन, जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्‍वरी, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे उपस्थित होते. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे व पक्ष संगठन वाढविण्यात यावे, असे आवाहन माजी मंत्री देशमुख यांनी केले.विशेष म्हणजे या बैठकीत जिल्हा अध्यक्ष निवडण्याचे सर्व अधिकार एकमताने खा. पटेल यांना देण्याचा ठराव पारीत करण्यात आला.याबद्दल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी निलय नाईक यांनी सर्वांनी खासदार पटेलांवर विश्‍वास ठेवून माझी जवाबदारी कमी केल्याचे मत व्यक्त केले.
सभेला धनंजय दलाल, देवेंद्रनाथ चौबे, विजय राणे, गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर, मनोहर चंद्रिकापुरे, पंचम बिसेन, बबलू कटरे, अशोक गुप्ता, अशोक सहारे, डॉ. सुशील रहांगडाले, प्रेम रहांगडाले, रमेश ताराम, तुकाराम बोहरे, दुर्गा तिराले, केवल बघेले, जगदीश बहेकार, कुंदन कटारे, पंकज यादव, बालकृष्ण पटले, महेश जैन, लक्ष्मण नागपुरे, श्रीकृष्ण खोटेले, लता रहांगडाले, केतन तुरकर, शिव शर्मा, डॉ. अविनाश काशीवार, प्रभाकर दोनोडे, कमल बहेकार, तुंडीलाल कटरे उपस्थित होते.