डॉक्टरांचे सोनोग्राफी बंद आंदोलन

0
20

चंद्रपूर : पीसीपीएनडीटी कायद्यातील काही जाचक नियमाचा विरोध करण्यासाठी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या नेतृत्वात सोनोग्राफी डॉक्टरांनी बुधवारी सोनोग्राफी बंद आंदोलन पुकारले. यावेळी येथील जटपुरा गेटवर डॉक्टरांनी निदर्शने करून आंदोलनाकडे लक्ष वेधले.
पीसीपीएनडीटी कायद्यातील काही बाबींना आयएमएमधील डॉक्टरांनी विरोध दर्शविला आहे. कागदोपत्री चुकांना या कायद्यात गंभीर गुन्हा ठरविले आहे. ही बाब अन्यायकारक आहे. या कायद्यात काही सुधारणा कराव्यात, अशी डॉक्टरांची मागणी आहे. यात कागदोपत्री चुकांना दंड अथवा सूचना द्यावी, कागदोपत्री कारकुनी चुकांना मेडीकल कौन्सीलचे रजिस्ट्रेशन रद्द करू नये, न्यायालयीन केसेसमध्ये किंवा कागदोपत्री चुकांच्या केसेसमध्ये क्लिनिकचे नुतनीकरण थांबविण्यात येऊ नये, स्त्रीभ्रृण हत्येच्या संदर्भात रुग्णाच्या पालकांना व नातेवाईकांवरसुध्दा दंडनीय कारवाई होणे आवश्यक आहे, परीक्षक्ष चमूमधील पोलीस यंत्रणा पोशाखात असू नये, जेणेकरून दवाखान्याच्या इभ्रतीस धोका पोहचणार नाही आदींचा समावेश आहे. जटपुरा गेटवर निदर्शने देताना आयएमएचे अध्यक्ष डॉ. अशोक भुक्ते, डॉ. मंगेश गुलवाडे, आयएमएचे सचिव डॉ. प्रसाद पोटदुखे, स्त्री रोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्ष डॉ. निलिमा मुळे, डॉ. कल्याणी दिक्षित, डॉ. विलास झुल्लूरवार, डॉ. रजनीकांत भलमे, डॉ. मंगेश टिपणीस, डॉ. विश्‍वास झाडे, डॉ. प्रेरणा कोलते, डॉ. रवी आल्लूरवार, डॉ. संजय घाटे उपस्थित होते.