जिल्ह्यात होणार ११२ रस्ते सभागृहांचे बांधकाम

0
7

नवेगावबांध : प्रदीर्घ काळानंतर गोंदिया जिल्ह्याला स्थानिक जनप्रतिनिधीचे पालकत्व मिळाले.त्यामुळे पालकमंत्री राजकुमार बडोले हे विकासकामांना गती देतील, अशी अपेक्षा बाळगली जात होती.यानुरूप पालकमंत्री बडोले यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनी सुचविलेल्या कामांना ग्रामीण विकास व जलसंधारण विभागाने मंजुरी दिली असल्याची माहिती ना.बडोले यांच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली.
जिल्ह्यात २५/१५ या लेखा शिर्षांतर्गत ४.५कोटींच्या निधीतून जवळपास ११२ विकासांची कामे होणार आहेत.अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रात ४0 विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात जुळणार आहे.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध होणे हे गरजेचे असते.यानुरूप जिल्ह्यातील आमदार व पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी राज्य शासनाकडे अनेक विकासातामक कामे सुचविली होती. याबाबत पालकमंत्री बडोले यांनी शासनाकडे पाठपुरावा करून कामांना मंजुरी मिळवून घेतली आहे.
२५/१५या लेखा शिर्षकाअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील ११२रस्ते व सभागृहाच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता राज्य शासनाच्या ग्रामीण विकास व जलसंधारण विभागाने शासन निर्णय निर्गमित करून दिली आहे.
अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रात गोरेगाव तालुक्यातील पाटेकुर्रा, सडक-अर्जुनी तालुक्यातील कोसमघाट, कोसमतोंडी, खोडशिवनी, फुटाळा, राका, मुंडीपार, चिखली, डोंगरगाव, डव्वा, पुतळी, चिंगी, कोहमारा, कोदामेढी, खुश्रीपार, तिडका, पांढरवाणी, पांढरी, परसोडी, सडक-अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ताळगाव, बोरी, तिडका, देवलगाव, निमगाव, भरनोली, राजोली, धाबेटेकडी, गवर्रा, बाक्टी, दाभना, देऊळगाव, गौरनगर, सिलेझरी, बोंडगाव, कोरंभीटोला, खामखुर्रा, इटखेडा, वडेगाव-रेल्वे व धाबेटेकडी-आदर्श या गावांसह देवरी तालुक्यातील ५८ लाखांची १७ कामे, आमगाव तालुक्यात १८ लाखांची ७ कामे, सालेकसा तालुक्यात २४ लाखांची ८ कामे, तिरोडा तालुक्यात ४६ लाखांची १५, गोरेगाव तालुक्यात ३0लाखांची ११कामे व गोंदिया तालुक्यात ७१लाखांची १४कामे मंजूर झाली आहेत. ना. बडोले यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील ग्रामीण भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात जुळणार आहे.