गोंदिया,दि.१४ः- पंचायत समितीच्या मासिक सभेने सर्वसम्मतीने घेतलेल्या ठरावानंतरही महिला बालविकास प्रकल्प कार्यालयाने पंचायत समितीच्या ठरावाला केराची टोपली दाखवत काटी क्षेत्राच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती दाते यांच्यावर मेहरबानी दाखविल्याने अंगणवाडी सेविकामंध्ये असंतोष दिसून येत आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार करुनही त्यांनी याकडे केलेले दुर्लक्ष प्रशासनातील ढिसाळपणा दाखवत असल्याचे म्हटले जात आहे.
सविस्तर असे की, गोंदिया बालविकास प्रकल्प कार्यालय क्रमांक १ अंतर्गत कार्यरत असलेल्या काटी क्षेत्राच्या अंगणवाडी पर्यवेक्षीका श्रीमती व्ही.आर.दाते यांच्याबद्दल अंगणवाडी सेविाकांनी१६ सप्टेंबरला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली.त्या तक्रारीमध्ये मे २०१९ मध्ये १ दिवसाचे मानधन कपात केल्याचा उल्लेख केला आहे.प्रवासभत्यातही ३० टक्के कपात करुन रक्कम दिल्याचे म्हटले आहे.अंगणवाडी सेविकांवर दबावतंत्राचा वापर करुन लाईनलिस्टींगचे काम करवून घेणे,मासिक प्रगती अहवाल ऑनलाईन करण्याकरीता ३५० रुपयाची मागणी करणे,बीट अतंर्गत बैठक आयोजित करुन बैठकिला दांडी मारणे,अंगणवाडी केंद्राला भेट देण्यास न येताच कार्यालयात व्हीजीटबुक मागवून त्यावर लिहीणे,ताज्या आहाराकरीता येणाèया रक्कमेतून २० टक्के मागणी,काटी क्षेत्रात पर्यवेक्षिका म्हणून रुजु झाल्यापासून एकही महिला मेळावा श्रीमती दाते यांनी घेतले नसल्याचे म्हटले आहे.तर बघोली येथील अंगणवाडी सेविका श्रीमती नागवंशी यांना डस्टर फेकून मारहाण केल्याचे म्हटले आहे.क्षेत्रातंर्गतच्या २३ अंगणवाडी सेविकाकडून आहार तपासणीच्या नावावर प्रती अंगणवाडी १२०० रुपये घेतल्याची तक्रारही करण्यात आल्याचे अंगणवाडी सेविका दुर्गेश्वरी खरे,आर.एस.तुरकर,श्रीमती खेलन नागवंशी,सौ.बागडेसह इतरांनी मुख्य कार्यकारी अधिकारी,बालविकास प्रकल्प अधिकारी व पंचायत समितीला केल्याचे म्हटले आहे.विशेष म्हणजे श्रीमती दाते यांची तक्रार पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना बघोली,कासा,काटी व बिरसोला येथील सरपंचानी करुन हटविण्याची मागणी केली होती.त्यावर गोंदिया पंचायत समितीच्या १७ जुन २०१९ च्या मासिक सभेत चर्चा करुन अंगणवाडी पर्यवेक्षिका दाते यांना तत्काळ हटविण्याचा ठराव सर्वसमंतीने पारित करण्यात आला होता.त्यासंदर्भातील माहितीही बालविकास प्रकल्प अधिकारी क्र.१ यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांना कळविले होते.त्यांनंतरही कारवाई न करता त्यांच्यावर प्रशासन का मेहरबानी दाखवित आहे असा प्रश्न निर्माण झाला असून ज्या अंगणवाडी सेविकांना त्रास होत आहे,ज्यांनी तक्रार केली त्यांच्यावर अजून अन्याय केला जात असल्याचे वृत्त समोर येत आहे.




