नवेगावबांध दिं.१६. थोर स्वतंत्रता सेनानी, जननायक,क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची 144 वी जयंती नवेगावबांध पोलीस ठाण्यात व परिसरात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बरोबरच माध्यमिक विद्यालयातही विविध उपक्रमाद्वारे बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.नवेगाव बांध येथीलपोलीस ठाण्यात ठाणेदार अनिल कुंभरे, नक्सल सेलचे पोलीस निरीक्षक कोडापे यांच्या उपस्थितीत, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य टाकसाळे,जि. प. प्राथमिक शाळा क्रमांक एक-दोन दोन,बी. ए. डी. विद्यालय प्राचार्य काशीवार, उमाबाई संग्रामे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य दत्ता संग्रामे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय मुख्याध्यापक किशोर शंभरकर, सावित्रीबाई फुले ज्ञानपीठ मुख्याध्यापक उंदीरवाडे,जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमीक शाळा भिवखिडकी येथे मुख्याध्यापक सिद्धार्थ खोब्रागडे,टिकाराम संग्रामे, दुधराम बारापात्रे, प्रमोद चांदेवार , वंदना तुळशीकर , केशव कोल्हे , ज्ञानेश्वरी संग्रामे यांच्या उपस्थितीत जयंती उत्सव संपन्न झाला.
तसेच परिसरातील सावरटोला येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका उज्वला मेंढे, छत्रपती शिवाजी विद्यालय मुख्याध्यापक लांजेवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरटोला मुख्याध्यापक सुरेंद्र जांभूळकर ,अर्चना उरकुडे यांच्या उपस्थितीत ,जननायक बिरसा मुंडा जयंती चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढल्यात तसेच काही शाळातून चित्रकला स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. प्रारंभी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून त्यांना अभिवादन करण्यात आले.अतिथींचे यावेळी भाषणे झालीत. भाषणातून जननायक बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी जीवनकार्यावर सर्वच वक्त्यांनी प्रकाश टाकला.कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
जननायक बिरसा मुंडा यांची १४४ वी जयंती सम्राट अशोक विद्यालयात साजरी
नवेगावबांध- थोर स्वतंत्रता सेनानी, जननायक,क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची 144 वी जयंती सम्राट अशोक विद्यालय उमरी येथे उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस टेंभुर्णी होते यावेळी केम भैसारे हटवार एम यु घरोटे एच एस पात्रीकर म्हणून उपस्थित होते.प्रारंभी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून त्यांना अभिवादन करण्यात आले.विद्यार्थिनी स्नेहल तवाडे व अतिथींचे यावेळी भाषणे झालीत. भाषणातून जननायक बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी जीवनकार्यावर सर्वच वक्त्यांनी प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. व्ही. बडोले यांनी केले, तर कार्यक्रमाचे संचालन एस.ए. नंदेश्वर यांनी केले. उपस्थितांचे आभार जगदीश हटवार यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र साखरे, बी. आर. पंचलवार, बाळकृष्ण टेंभुर्णी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
भारताचे पहिले पंतप्रधान व थोर स्वतंत्रता सेनानी पंडित जवाहरलाल नेहरू यांची 130 वी जयंती सम्राट अशोक विद्यालय उमरी येथे बालक दिवस म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस एस टेंभुर्ण हे होते, यावेळी मंचावर एस. व्ही.बडोले,एम. यु. घरोटे एस. ए. नंदेश्वर, एच. एस. पात्रीकर अतिथी म्हणून उपस्थित होते.प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून त्यांना अभिवादन करण्यात आले.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन कार्यावर अतिथी व विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीव बडोले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन एस. ए. नंदेश्वर यांनी केले.तर उपस्थितांचे आभार मंगलदास घरोटे यांनी मानले.विद्यार्थ्यांना खाऊ वाटपा नंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
पिंडक़ेपार येथे क्रांतिवीर बिरसामुंडा जयंती साजरी
गोरेगांव तालुक्यातील येत असलेल्या पिंडकेपार येतील जिल्हा परिषद शाळा येथे क्रांती वीर बिरसामुंडा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद शाळाचे व्यवस्थापन अध्यक्ष भरत घासलेे, प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक पी. डी. पटले , रमेश बिसेन, ग्राप सदस्य सुशीला टेभूर्निकर, भुनेश्वरी पटले, दीपा रजनीश साखरे, शिक्षक पारधी , बोपचे, शिक्षिका ब्रमहनकर , मुनेश्वर कटरे आदीच्या उपस्थित हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या वेळी अध्यक्षस्थानी बोलत असताना भरत घासलेे व मुख्याध्यापक पटले यांनी क्रांतिवीर बिरसामुंडा यांनी केलेल्या कामांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमला शाळेच्या सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मुनेश्वर कटारे यानी केले तर आभार बोपचे यानी मानले.





