24.4 C
Gondiā
Saturday, August 22, 2026
Home विदर्भ आ. अग्रवाल यांच्या हस्ते ७६७३१९ रुपयांचे शासकीय अनुदान वितरण

आ. अग्रवाल यांच्या हस्ते ७६७३१९ रुपयांचे शासकीय अनुदान वितरण

0
38
गोंदिया दि. १६ :  : गोंदिया विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त कुटुंबाना शासकीय मदतीचे धनादेश वाटप नुकतेच तहसील कार्यालय येथे करण्यात आले. यावेळी तहसीलदार  राजेश भांडारकर, अप्पर तहसीलदार खडतकर,  वंजारी  (अव्वल कारकून), श्री. कटरे (निवडणूक विभाग), आशिष रामटेके (अव्वल  कारकून), श्री. रामटेके (प्रस्तुतकार तहसीलदार), आनंद बोरकर (प्रस्तुतकार अप्पर तहसीलदार) तसेच इतर कर्मचारी व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. वादळी वारा आणि अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे घरे क्षतिग्रस्त झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले असताना विनोद अग्रवाल यांनी मदतीसाठी पुढाकार घेत त्याचे तातडीने पंचनामे करण्यासंबंधी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळत अखेर तहसील कार्यलातर्फे आ. अग्रवाल यांच्या हस्ते एकूण ७६७३१९ रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. चुन्नीलाल हरिणखेडे रा. दागोटोला यांना रु. ४८२०१९,  सकून  मोहबंशी रा. शास्त्री वॉर्ड गोंदिया याना रु. ९५१००, सुंदरबाई  गणवीर रा. सावराटोली यांना रु. ९५१०० तर खेमराज आगासे  यांना ९५१०० रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
नैसर्गिक आपत्तीमुळे  झालेल्या नुकसानीची तात्काळ मदत मिळावी म्हणून आपण नेहमीच प्रयत्नशील राहू असे मनोगत यावेळी जनतेचे आमदार श्री. विनोद अग्रवाल यांनी मांडले. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्यांचे उर्वरित प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावण्यासंबंधी प्रशासनाला सूचना केल्या असून लवकरच त्यांचे देखील धनादेश वाटप करण्यात येईल असे आश्वासन देखील आमदार श्री. विनोदजी अग्रवाल यांनी उपस्थितांना दिले. दरम्यान  भाऊरावजी उके,  मुनेशजी रहांगडाले, मामा बनसोड, पापा  राणे, अजित  टेंभरे , ग्यानचंद जमईवार, कपिलजी राणे तसेच अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.