25.5 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ शेतक-यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्या:भाजपचे निवेदन

शेतक-यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्या:भाजपचे निवेदन

0
39

गोंदिया,दि.१९ः-परतीच्या पावसामुळे जिल्हातील धानपिकाचे ३५ ते ४० टक्के नुकसान झाल्याचे दिसुन येत आहे.यावर्षी १ लक्ष ९६ हजार हेक्टरवर खरीप हंगामात धानपिकाची लागवड करण्यात आले होते.त्यामुळे कमी कालावधीत नुकसानभरपाईचे सर्वेक्षण करणे कमी मनुष्यबळाअभावी शक्य नाही.त्यामुळे शेतक-यांना हेक्टरी २५  हजार रुपये  सरसकट नुकसानभरपाई जाहीर करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनातुन करण्यात आली आहे.

निवेदनात गोंदिया जिल्हात ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांचे पंचनामे सुद्धा झालेले नाही ते पंचनामे त्वरित करण्यात यावे.पंचनामे झालेले व न झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई  देण्यात यावी.पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना कागदपत्रांची कोणतीही अट न घालता नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी.शेतकऱ्यांच्या शेतावरील वीज बिल माफ करण्यात यावे व शेतसारा माफ करण्यात यावा.धान खरेदी केंद्राची संख्या वाढवून मंजुर केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे.केंद्रावरील बाजार समिती मार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा केंद्रावर देण्यात यावे. तसेच टोकन पद्धती इलेक्ट्रॉनिक काटे,चौकीदार,पिण्याचे पाणी,बैठक व्यवस्था इत्यादी सुविधा पुरवण्यात यावे.अतिक्रमणधारक असलेल्या धारकांना धान खरेदी करताना नमुना आठ ची अट शिथिल करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज मंगळवारला राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी माजी आमदार गोपालदास अग्रवाल,खोमेश रंहागडाले,नगराध्यक्ष अशोक इंगळे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ हमीद,सभापती शैलेजा सोनवाने,जिल्हा परिषद सदस्य माधुरी पाथोडे,पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर,गिरधारी हत्तीमारे,राजेश कठाणे,सुनिल केलनका,शामराव शिवणकर,लक्ष्मीकांत धानगाये,अशोक लंजे,शेषराव गि-हिपुंजे,पदमा परतेकी,हितेश डोंगरे,चंदन फरदे,डिलेश सोनटक्के,मयुर रामटेके,अशोक सिंघानिया,संजु कुलकर्णी,मुकेश हलमारे,जयंत शुक्ला,राहुल जोशी,गौरव बिसने,देवेंद्र अग्रवाल,प्रकाश रहागंडाले इतर पदाधिकारी उपस्थित होते.