25.5 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ जिल्हाधिकारी कार्यालयात इंदिरा गांधी यांना अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात इंदिरा गांधी यांना अभिवादन

0
43

भंडारा, दि. 19 : माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांच्या हस्ते स्व.इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी  उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड, येलचे उपस्थित होते.राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून यावेळी, देशाचे स्वातंत्र आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची व कधीही हिंसाचार अवलंबणार नाही. तसेच सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गाऱ्हाणी शांततामय आणि संविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवीन अशी शपथ घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात इंदिरा गांधी यांना अभिवादन
वाशिम, दि. १९ : भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज  जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा भुसंपादन अधिकारी राजेंद्र जाधव यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक प्रशांत जाधव  यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची व कधीही हिंसाचार अवलंबणार नाही. तसेच सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गाऱ्हाणी शांततामय आणि संविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवीन, अशी शपथ याप्रसंगी उपस्थितांनी घेतली.

दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जिल्हा प्रशासनातर्फे आदरांजली

गडचिरोली,दि.19: दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. हा दिवस  राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात प्र.जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे  यांनी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना यावेळी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, तहसिलदार एन.एम. ठाकरे, तहसिलदार श्री. भांडारकर (आस्थापना), निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार सुनिल चडगुलवार, नायाब तहसिलदार बी.एल. सोपनकर, नायाब तहसिलदार श्री. चव्हाण, नगर पालिका प्रशासनाचे श्री. शेटे, श्री. येरमे, जिल्हा नाझर डी.ए. ठाकरे, श्री. सोरते, वासुदेव कोल्हटकर, डी.एन. मेश्राम, वाय.बी. मेश्राम, श्री. चांभारे, व्ही. बी. चहांदे आदि. कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी  वृंदानी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.