24.3 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ पांढराबोडी व मोहरणा निर्वाचक गणाच्या रिक्त पदांच्या  पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर

पांढराबोडी व मोहरणा निर्वाचक गणाच्या रिक्त पदांच्या  पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर

0
23

भंडारा, दि. 20 : भंडारा पंचायत समिती निर्वाचक गण क्र.59 –पांढराबोडी व लाखांदूर पंचायत समिती निर्वाचक गण क्र.101-मोहरणाच्या रिक्त पदाच्या पोटनिवडणूकाच्या तारखांची सूचना व निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झालेला आहे.59- पांढराबोडी व 101- मोहरणा  निर्वाचक गणाच्या रिक्त पदांचा पोटनिवडणूक कार्यक्रम या प्रमाणे आहे. 27 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत नामनिर्देशन सादर करण्याची शेवटची तारीख, 28 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी, नामनिर्देशन सादर करण्याची व त्याची छाननी करण्याचे ठिकाण तहसिल कार्यालय भंडारा व लाखांदूर, 12 डिसेंबर 2019  रोजी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. तहसिल कार्यालय भंडारा व लाखांदूर येथे 13 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.