Ø डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर
Ø जिल्हा परिषद भंडारा व एचडीएफसी बँकेचा संयुकत् उपक्रम
भंडारा, (6 डिसेंबर ) :-भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण् दिनाचे औचित्य साधून आज 6 डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरात जिल्हा परिषदेच्या 53 अधिकारी- कर्मचा-यांनी रक्तदान करून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. तर बिपी व शुगर सारख्या आजाराची कर्मचा-यांनी तपासणी करून घेतली. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन आहे. जिल्हा परिषद भ्ंडारा येथे सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश बागडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजुषा ठवकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) मनिषा कुरसंगे, मुख्य वित्त् व लेखाधिकारी योगेश जाधव व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी, मार्ल्यापण करून आंदरांजली वाहिली. त्यासोबतच विभाग प्रमुख व कर्मचा-यांनी पुष्य अर्पण करून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले. त्यानंतर जिल्हा परिषद सभागृहात अधिकारी-कर्मचा-यांसाठी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र भंडारा यांच्या चमूने बिपी व शुगर आजाराबाबत अधिकारी व कर्मचा-यांनी तपासणी करून घेतली. एचडीएफसी बँक व जिल्हा परिषद भ्ंडारा यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्त्दान शिबिरात साई ब्लड बँक सक्करदरा नागपुर यांची चमू विजय, राहूल, पूनम, पल्लवी, मयूरी व अश्वीन यांनी रक्तदानाचे कार्य उत्तमरित्या पार पाडले. जिल्हा परिषदेमधील विविध विभागातील तब्बल 53 अधिकारी व कर्मचा-यांनी रक्तदान करून घेतले.
आरोग्य शिबिरात मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी, स्वत: उपस्थित राहून अधिकारी व कर्मचा-यांनी रक्तदान करावे व आरोग्य तपासणी घ्याव्यात याकरिता लक्ष घातले. कर्मचा-यांशी संवाद साधून रक्तदान व आारोग्य तपासणी करूण घेण्यासाठी प्रोत्साहीत केले. महापरिनिर्वाण दिनी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात कर्मचा-यांनी रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.यावेळी रक्तदात्यांना रक्तदान केल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांचे हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू वितरीत करण्यात आले. मागील वर्षीही अशाच प्रकारचे शिबिर आयोजित करून अधिकारी व कर्मचा-यांनी रक्तदान केले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचा-यांनी रक्तदान करून बाबासाहेबांना आदरांजली वाहिल्याने जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाचे कौतूक केले जात आहे.




