चंद्रपूर,दि.02 जानेवारीः- महिलाना शिक्षणाचा अधिकार देत महिला शिक्षित झाल्या पाहिजे. यासाठी संघर्ष करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या खऱ्या शिक्षण प्रणेत्या आहेत.आज महिला शिक्षित झाल्याने स्वताच्या न्याय हक्का प्रति जागृत झाल्या असल्या तरीही त्यांनी यावर न थांबता प्रत्येक महिलानी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवल्यास सावित्रीबाई फुले यांना खरी आदरांजली होईल असे प्रतिपादन आ. किशोर जोरगेवारांनी केले. ते बुधवार 1 जानेवारीला नगीनाबाग येथ महात्मा जोतिबा फुले समाज सुधारक मंडळ जिल्हा चंद्रपूरच्या व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळांच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा व प्रबोधन मेळाव्यात बोलत होते.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.





