33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ तिजोरीत जमा न करता सहा लाखाची रक्कम वापरली तहसिलदाराने

तिजोरीत जमा न करता सहा लाखाची रक्कम वापरली तहसिलदाराने

0
244

गोंदिया,दि.०८ः-अवैध गौणखनिज वाहतुक करतांना पकडण्यात आलेल्या वाहनाकंडून प्रत्येकी २ लाख रुपये प्रमाणे वसुल करण्यात आलेले ६ लाख रुपये शासकीय तिजोरीत जमा न करता स्वतःच्या लाभाकरीता वापरुन शासनाची फसवणूक केल्याबद्दल गोंदिया ग्रामीण तहसिलदारावंर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश दुरुगकर यांनी जिल्हाधिकारी यांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.दुरुगकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीमध्ये गोंदिया तालुक्यातील खळबंदा येथील तलाठी साजा क्रमांक ३ यांच्या कार्यक्षेत्रात नायब तहसिलदार व मंडळ अधिकारी यांच्या तपासणी पथकाने ३० ऑक्टोंबर २०१८ रोजी ३ टिप्पर (एमएच ३५,एजे ०४६९,एमएच ४० वाय ३६९५ व एमएच ३१ सीक्यु ३८६७)अवैधरित्या गौणखनिजाची वाहतुक करतांना पकडले आणि त्यांच्यावर कारवाई केली.त्यावर तत्कालीन तहसिलदार राहुल सारंग यांनी तिन्ही टिप्पर मालकावर प्रत्येकी २ लाख २४ हजार ९०० रुपये दंड गौनखनिज प्रकरणात ३१ ऑक्टोंबर २०१८ रोजी आकारण्याचा आदेश पारित केला.परंतु त्यानंतर पुन्हा दुसरा आदेश त्याच तारखेत काढून तिन्ही टिप्पर मालकांना २ लाख रुपयाचे शास्ती रक्कम न आकारता प्रत्येकी २४ हजार ५०० रुपयाचा दंड शासन जमा करण्याचा आदेश पारित केले.यावरुन तत्कालीन तहसिलदार यांनी टिप्पर मालकाकडून प्रत्येकी २ लाख रुपये असे ६ लाख रुपये गोळा करुन स्वतःच्या लाभाकरीता वापरत तहसिल कार्यालयातील कर्मचाèयांशी संगनमत करुन शासनाला आर्थिक नुकसान पोचविल्याचे म्हटले आहे.शासनाची दिशाभुल करुन महसुल बुडवल्याप्रकरणात संबधितावर कलम ४०६,४०९,३४ अन्वये फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.