गोरेगाव,दि.०८ः-– आजचे युग हे वैश्विकरणआजच्या युगात शिक्षणाबरोबर संस्काराची नितांत गरज:-प्रा. लोकेश कटरे व तंत्रज्ञानाचे गतिमान युग आहे,आजच्या युगात जरी शिक्षणाचा झपाट्याने प्रसार-प्रचार झाले असले तरी आजच्या पीढीला संस्कारांचा,मानवी मूल्यांचा विसर पडू लागला आहे म्हणून आजच्या पीढीला शिक्षणाबरोबर संस्काराची नितांत गरज आहे. अशाप्रकारचे मौलिक विचार आदिलोक विद्यालय व क. महाविद्यालय बोळुंदा द्वारा आयोजीत ‘मराठी भाषा संवर्धनाच्या दिशा’ या विषयावरील व्याख्यानातून प्रमुख वक्ता या स्थानावरून जगत महाविद्यालयाचे मराठी विषयाचे प्रा. लोकेश कटरे यांनी व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य के.एस. वैद्य तर विचारमंचावर प्रमुख उपस्थितीत प्रा. उमेश राणे, शाळेचे शिक्षक ठाकुर,अंबुले, चुलपार व राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. पुढे बोलतांना प्रा. लोकेश कटरे म्हणाले की, खरे शिक्षण व संस्कार हे मातृभाषेतूनच दिले जाऊ शकतात त्याकरीता मराठी भाषेचे संवर्धन व जतन करणे ही काळाची गरज आहे.कार्यक्रमाचे औचित्य साधून अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य के.एस. वैद्य यांनी मराठी भाषेत गोडवा कसा आहे? हे पटवून दिले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता शाळेचे प्राचार्य व सर्व शिक्षकवृंद यांनी अथक परिश्रम घेतले.





