अभियंत्यांच्या निलंबनाचा केला निषेध

0
21

गोंदिया दि. 8:: यवतमाळ येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक फुलकर यांच्यासह अन्य दोघा वरिष्ठ अधिकार्‍यांना निलंबीत केल्याबद्दल येथील सर्व कर्मचार्‍यांच्या कृती समितीने ५ मे रोजी महावितरणच्या रामनगर प्रविभागीय कार्यालयासमोर द्वारसभा घेऊन निषेध नोंदविला.
यवतमाळचे अधिक्षक अभियंता फुलकर, उपकार्यकारी अभियंता सुरेश झाडे व सहायक अभियंता संजय कांबळे यांन तत्काळ निलंबीत करण्यात आले. एकीकडे वीजचोरी पकडण्यासाठी महावितरण व महाराष्ट्र इप्सन अभियंत्यांवर दबावतंत्र वापरत असून वीजचोरी पकडली नाही तर दंड करण्याची धमकी व पगार कापण्याचे पत्र देतात. दुसरीकडे चोरी पकडली तर उजार्मंत्री व ग्राहक प्रतिनिधींच्या दबावात येऊन निलंबनाची कारवाई केली जाते. या घटनेचा कृती समितीद्वारे ५ मे रोजी द्वारसभा घेऊन निषेध नोंदविण्यात आला.
विशेष म्हणजे, निलंबीत करण्यात आलेल्या तिनही अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे नाही. तसेच कोणतिही पोलीस वा शिस्तभंगाची चौकश्ी नाही. त्यामुळे तिघांचे निलंबन रद्द करण्यात यावे अशी मागणीही कृती समितीने केली आहे. या द्वारसभेला हरीष डायरे, विवेक काकडे, अभय मेश्राम, योगेश्‍वर सोनुले, सचीन उके, सुनिल मोहुर्ले, मंगेश माडीवाले, गणेश चव्हाण, सुनिल रेवतकर, दिंगबर कटरे, राजू गोंधरे, आनंद जैन, विश्‍वजीत मेंढे, मोकाशी, एस.एस.वाघ यांच्यासह बहुसंख्येने कर्मचारी उपस्थित होते.