महिलांनी आपली शक्ती जागृत करण्याची गरज- मोना श्रीवास्तव

0
15

गोंदिया दि. 8: महिला स्वत: शक्ती असून आज त्यांना आपली शक्ती जागृत करून योग्य दिशा देण्याच गरज असल्याचे प्रतिपादन मोना श्रीवास्तव यांनी केले. येथील जेसीआय गोंदिया, मानवाधिकार संघटना व नवशक्ती ग्रुुपच्या संयुक्तवतीने आयोजित नृत्य प्रशिक्षण व व्यक्तीत्व विकास शिबिराच्या उद््घाटनप्रंसगी मुख्य पाहुणे म्हणून मंगळवारी (दि.५) केले.
येथील एस.एस.गर्ल्स शाळेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रद्धा अग्रवाल होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बिना पटेल, जेसीआयचे विभागीय संचालक धर्मिष्ठा सेंगर, नव शक्ती ग्रुपच्या अध्यक्ष ममता जैन, मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष अनिल डोंगरवार, कार्यक्रम संचालक आदेश शर्मा, सचिव कश्मिरा संघानी, कत्थक गुरू हर्षज पुंडकर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी कृतीका सेठ, महेश ठकरानी, उमा मोदी, अर्चना नंदघले, प्रणय मेहता, तन्वी श्रीरामे, शिखा भागलकर, कविता शर्मा, शीतल शाह, श्‍वेता छितरकासह जेसीआय सदस्यांनी सहकार्यकेले.