गोंदिया,दि.16ः- मागेल त्याला काम या उद्देशाने सुरू असलेली महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत प्रत्येक गावामध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात यावे, मंजुरांची रोजगाराच्या शोधात भटकंती होवू नये याची यंत्रणेच्या प्रत्येक अधिकारी कर्मचाèयांनी दखल घ्यावी असे निर्देश आमदार विनोद अग्रवाल यांनी दिले. गोंदिया पंचायत समिती येथ आयोजित आढावा बैठकीत त्यांनी अधिकाèयांना सूचना करून अडिअडचणी जाणून घेतल्या. गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये मंजुरांची संख्या मोठया प्रमाणात आहे. रोजगाराच्या शोधात मजुरांची भटकंती होत असते हे थांबविण्यासाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची अमलबजावणी प्रत्येक गावामध्ये योजनेतंर्गत कामे मंजूर करून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करावी असे यंत्रणेला आमदार विनोद अग्रवाल यांनी निर्देश दिले.
याप्रसंगी उपस्थित यंत्रणेच्या अधिकाèयांकडूननियोजीत कामांसह योजनेचा आढावा घेतला. यावेळी अधिकाèयांनी योजनेतंर्गत येणाèया विविध अडचणी व त्यामुळे होणाèया कामातील विलंब याबाबतची माहिती दिली. यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी येणाèया अडीअडचणी दूर करण्यासंदर्भात आपण सातत्याने पाठपुरावा करत राहू अशी ग्वाहीदेखील आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली. या बैठकीत खंडविकास अधिकारी, जावेद इनामदार तसेच एपीओ एम.एस. बिसेन, टीपीओ डी.झेड.लिल्हारे, एस.आर.टेंभरे, व्ही.सी.धावडे, वाय.डी.धावडे, के.एम.डहाट, ए.एच.हरिणखेडे, एच.के. लिल्हारे, व्ही.डी.कावरे, व्ही.सी.धाकडे, वाय.डी.धावडे, के.एम डहाट, व्ही.डी.कावरे, आणि पी.के.पारधी उपस्थित होते.





