भंडारा,दि.16ः– भंडारा जिल्हयातील प्रत्येक गावात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात स्पर्धा निर्माण व्हावी. प्रत्येक ग्राम पंचायतींना पाच लाखांचे पारितोषीक मिळाले पाहिजे अशा ग्राम पंचायती तयार कराव्यात. सरपंचनी हे काम संघटीतपण करावेत. याकरिता स्थानिक स्तरावर योजनांच्या अंमबजावणीचे आराखडे तयार करावेत. याकरिता निधीची कमतरता भासणार नसल्याचे सांगून पुढच्या २०२० च्या काळात गावाच्या विकासाच्या संधीचे सोने करावे असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद भंडाराचे वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हा परिषद क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाèया ५२ ग्राम पंचायतींच्या गौरव कार्यक्रमा प्रसंगी साखरकर सभागृहात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे तर प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रेमदासजी वनवे, शिक्षण व अर्थ समिती सभापती धनेंद्र तुरकर, महिला व बालकल्याण समिती सभापती रेखा राजेश बागडे, महिला व बालविकास अधिकारी मनिषा कुरसंगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मंजुषा ठवकर आदींची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी, संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सोबतच थोरमहात्म्यांनी, देश घडविण्यासाठी महान कार्य केले. त्यांच्या महान कार्याचा आदर्श घेऊन आपला गाव आदर्श करायचा आहे. संत गाडगेबाबा यांनी किर्तनाच्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ निर्माण केली.
आपण स्वच्छ राहिलो तर आपला घर व गाव स्वच्छ करता येतो. भंडारा जिल्हा हा हागणदारीमुक्त झाला असला तरी समाजाला अजूनही स्वच्छतेच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करायचे आहे. गाव स्वच्छ असेल तर रोराई किंवा आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. परंतु अस्वच्छता असेल तर विविध प्रकारची रोगराईहोते. त्यामुळे प्रत्येकाने गावाची स्वच्छता करण्यासाठी आपले योगदान दयावे, असे आवाहन करीत तरूणांना व्यसनमुक्त करण्याचे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले. त्यानंतर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्हा परिषद क्षेत्रात प्रथम क्रमांकाने विजेत्या ठरलेल्या ५२ ग्राम पंचायतींचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र विधानसभेच अध्यक्ष नानाभाऊ पटोले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांचे हस्ते विजेत्या ग्राम पंचायतींना ५० हजार रूपयाचा धनादेश, ट्राफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच पाणी व स्वच्छता विषयक माहिती नागरिकांना उपयुक्त ठरणाèया २०२० दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी तर कार्यक्रमाचेसंचालन व आभार मुकूंद ठवकर यांनी केले. कार्यक्रमासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे तज्ञ, सल्लागार यांनी परिश्रम घेतले.





