29 C
Gondiā
Sunday, June 28, 2026
Home विदर्भ प्रधानमंत्री आवास योजनेसंबंधी दिल्लीत सचिवांशी चर्चा – खा सुनील मेंढे 

प्रधानमंत्री आवास योजनेसंबंधी दिल्लीत सचिवांशी चर्चा – खा सुनील मेंढे 

0
29

गोंदिया,दि.17ःगोंदिया -भंडारा जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणी संबंधी तसेच समस्यांचे निराकरण करण्याच्या मुद्याला घेऊन भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे यानी १६ जानेवारीला दिल्लीत ग्रामीण विकास मंत्रालयातील विशेष अधिकारी प्रशांत कुमार तसेच शहरी विभागातील अधिकारी अम्रित अभिजात यांची भेट घेत चर्चा केली. खासदार मेंढे यांनी नुकत्याच  पार पडलेल्या DISHA कमिटीच्या बैठकीत या योजनेसंबंधी असलेल्या समस्यांवर प्रशासनाकडून काय उपाययोजना करण्यात आल्या याची माहिती मागितली होती. तसेच या योजनेच्या अंमलबजावणी संबंधी काही तक्रारी स्थानिक नागरिकांनी खासदारांना केल्या होत्या.
त्या सर्वांची दखल घेऊन खासदार मेंढे यांनी तातडीने दिल्लीत ग्रामीण विकास मंत्रालयातील विशेष सचिव प्रशांत कुमार यांची भेट घेतली.या भेटीत PMAY योजनेत लाभार्थींची पुढील टप्प्यातील यादी हि राज्य सरकारकडून अपेक्षित असलेल्या यादीला होत असणाऱ्या उशिरामुळे जाहीर होत नसून लाभार्थींच्या यादीत एससी आणि एसटी प्रवर्गातील नावांचा समावेश हा राज्यस्तरावर राबवायचा विषय असल्याची बाब सचिवांनी खासदार मेंढे यांना असल्याचे सांगितले. तसेच ज्या नागरिकांकडे जमीन उपलब्ध नाही त्यांना राज्य सरकार प्रत्येकी ५०,००० रुपयांचे अर्थसाह्य देऊ शकत असल्याची माहिती देखील सचिवांनी दिल्याचे मेंढे यांनी म्हटले आहे.जिल्हा आणि राज्य स्तरावर उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या अभावामुळे मोदी सरकारच्या या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध समस्या निर्माण होत असून या समस्यांची दखल घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाने  तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे खासदार मेंढे यांनी नमूद केले.