38 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ न.प.च्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार शुुध्द मिनरलयुक्त पाणी-नगराध्यक्षा योगिता पिपरे

न.प.च्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार शुुध्द मिनरलयुक्त पाणी-नगराध्यक्षा योगिता पिपरे

0
35
गडचिरोली,दि. २४ :,- नगरपरिषदेचे विद्यार्थी कॉन्व्हेंटच्या तुलनेत कुठेही कमी नसून शिक्षणातसुध्दा पुढे आहेत. मुलांचे आरोग्य चांगले रहावे. तसेच उन्हाळ्यात व वर्षभर पिण्याचे पाणी स्वच्छ व आरओ मिनरलयुक्त थंड  पाणी मिळावे. याकरिता नगरपरिषदेच्या सर्व दहाही शाळांमध्ये वॉटर कुलर बसविण्यात आले आहे. त्यामुळे नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शुध्द मिनरलयुक्त पाणी मिळणार असून त्यांचे आरोग्य सुदृढ राहणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी केले.
गडचिरोली नगरपरिषदेतील शिक्षण विभागाच्यावतीने दहा शाळा चालविल्या जातात. या दहाही शाळांमध्ये सन २०१९-२० च्या अंदाजपत्रकात शिक्षण विभागासाठी भरपूर निधी नमूद करण्यात आले. त्यामधून नगरपरिषदेच्या दहाही शाळांना उन्हाळ्यात पिण्याचे थंड पाणी मिळावे. तसेच आरोग्य चांगले राहावे. यासाठी आरओ मिनरलचे पाणी व वॉटर कुलर बसविण्यात आले. नगरपरिषद प्राथमिक शाळा रामपुर, प्रभाग क्रमांक ६ मधील आरओ वॉटर कुलरचे उद््घाटन नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्याहस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण सभापती वर्षाताई बट्टे, नवनिर्वाचित शिक्षण सभापती रितुताई कोलते, नवनिर्वाचित पाणी पुरवठा सभापती वैष्णवी नैताम, नवनिर्वाचित महिला बालविकास सभापती लताताई लाटकर, निताताई उंदिरवाडे, नगरसेवक मुक्तेश्वर काटवे, नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेवक प्रशांत खोब्रागडे, वासुदेव बट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना नगराध्यक्षा पिपरे म्हणाल्या, विद्यार्थ्यांना दप्तरांच्या ओझ्यासोबतच पाण्याची बॉटल घेऊन जावे लागत होते. आता तो त्रास होणार नाही. पूर्वी क्षारयुक्त व क्लोराईडयुक्त पाणी मिळायचे. आता स्वच्छ व थंड मिनरलयुक्त पाणी मिळणार आहे. तसेच आकांक्षित जिल्हा म्हणून डीपीडीसी मधून एक कोटी रुपये मंजूर झाले असून यामधून नगरपरिषदेच्या शाळांतील सर्व वर्गखोल्यांचे डिजीटलायझेशन, ई-लर्निंग व खेळाचे साहित्य देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मार्गदर्शनातून शिक्षण सभापती वर्षा बट्टे म्हणाल्या, एक वर्षांपासून मी सभापती पदावर असतांना नगराध्यक्षा पिपरे यांच्या मार्गदर्शनात आरओ व मिनरलयुक्त वॉटर कुलर न.प.च्या दहा शाळांना देण्याचे व खर्चाचे नियोजन करण्यात आले. आज त्याचे रितसर उद््घाटन झाले आहे. माझ्या वर्षभराच्या काळात पहिल्यांदाच शिक्षण दिनानिमित्त २० आदर्श शिक्षकांना पारीतोषिक देवून गौरविण्यात आले. सोबतच वर्षभराच्या काळात क्रीडा संमेलनसुध्दा भरविण्यात आले. मी नगरपरिषद शाळांचा विकास करण्यासाठी पूर्ण लक्ष दिले, असेही त्या म्हणाल्या.मार्गदर्शन करतांना नगरसेवक प्रमोद पिपरे म्हणाले, आरओ व मिनरलयुक्त वॉटर कुलरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाणी मिळणार आहे. नगरपरिषदेच्यावतीने राबविण्यात येणाºया रामपुर येथील शाळेलासुध्दा रामनगर नगरपरिषद शाळेसारखा आयएसओ मानांकित दर्जा प्राप्त होणार, अशी दर्जेदार गुणवत्तापुर्ण शाळा तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन निंबाळकर तर आभार मुख्याध्यापक साखरे यांनी मानले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, पालक वर्ग, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.