38 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभेचे २८ जानेवारीला बैेहर येथे अधिवेशन

राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभेचे २८ जानेवारीला बैेहर येथे अधिवेशन

0
31

गोंदिया,दि.24: राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभा व पवार राममंदिर ट्रस्ट बैहर तसेच राजाभोज स्मारक समितीच्यावतीने राष्ट्रीय अधिवेशन व राजाभोज प्रतिमा अनावरण कार्यक्रम येत्या २८ व २९ जानेवारी रोजी जिल्ह्यातील बैहर येथे आयोजित करण्यात आले आहे. २८ जानेवारी रोजी पवार क्षत्रीय महासभेचे राष्ट्रीय अधिवेशन सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती पवार क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि.मुरलीधर टेंभरे,संघठन सचिव खेमेंद्र कटरे,उपाध्यक्ष व राम मंदिर ट्रस्ट बैहरचे अध्यक्ष उमेश देशमुख यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
पवार क्षत्रिय महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनात मालवा प्रदेशातील पवार समाजाचे विलीनीकरण तसेच पवार राम मंदिर परिसरात आयुर्वेद महाविद्यालय सुरु करण्यावर चर्चा करण्यात येणार आहे. ता दरम्यान महासभेची वार्षिक सामान्य सभा व पवार समाज दर्शन पत्रिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभेचे अध्यक्ष मुरलीधर टेंभरे राहणार आहेत. तर उद्घाटन मध्यप्रदेशचे माजी मंत्री गौरीशंकर बिसेन यांच्या हस्ते होणार आहे.
प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. ढालसिह बिसेन, आमदार टामलाल सहारे, आमदार विजय रहांगडाले, आमदार इंद्ररसिंह परमार, राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभेचे माजी अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टेंभरे, इंजि.टी.डी.बिसेन, अखिल भारतीय भोयर पवार महासंघाचे अध्यक्ष डॉ.एन.डी.राऊत, कुलगुरु डॉ. प्रदीप बिसेन, गौरीशंकर टेंभरे, राम नारायणqसह परमार, कन्हैयालाल बोवाडे, शंकरलाल पवार,कैलास परमार, बन्नोqसह परमार, श्रीमती मधू परमार, श्रीमती पर्णा चौधरी, देवकरण परमार, दुर्गाप्रसाद परमार, एन.आर.डोंगरे यांच्यासह महासभेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
२९ जानेवारीला दुपारी १ वाजता राजाभोज प्रतिमेचे अनावरण करण्यात येणार आहे. त्या आधी सकाळी १० वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे. प्रतिमा लोकार्पण कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री गौरीशंकर बिसेन, खासदार डॉ. ढालqसह बिसेन, आमदार टामलाल सहारे, आमदार विजय रहांगडाले, आमदार  इंद्ररqसह परमार, राजेश बिसेन, प्रमोदqसह राणा, राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभेचे अध्यक्ष मुरलीधर टेंभरे यांच्या हस्ते पवार राम मंदिर ट्रस्ट बैहरचे अध्यक्ष उमेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाला डॉ. ज्ञानेश्वर टेंभरे, इंजि.टी.डी.बिसेन,डॉ.बी.एम. शरणागत, कन्हैयालाल बोवाडे, बालाघाट जि.प. अध्यक्ष रेखा बिसेन,  शिवनी जि.प. अध्यक्ष मिना बिसेन, माजी मंत्री लोचनलाल ठाकरे, माजी खासदार विश्वेश्वर भगत, के.डी. देशमुख, बोधqसग भगत, डॉ. खुशालचंद्र बोपचे, शिशुपाल पटले, माजी आमदार मधू भगत, ओंकार बिसेन, हेमंत पटले, खोेमेश्वर रहांगडाले, इतिहासकार डॉ. भगवतqसह परमार, माजी आमदार अशोक कळवे, मारोतराव खवसे, हरियाणाचे वेदपालसह परमार यांच्यासह गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभा, पवार राम मंदिर ट्रस्ट व राजाभोज स्मारक समितीच्यावतीने करण्यात आले आहे.