36.5 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home विदर्भ सावली येथे समाधान शिबीर व महिला मेळावा,350 नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ

सावली येथे समाधान शिबीर व महिला मेळावा,350 नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ

0
38

देवरी,दि.29ःतालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सावलीच्या वतीने समाधान शिबीर,महिला मेळाव्याचे आयोजन, आरोग्यशिबीर व ग्राहक सुविधा केंद्राच्या माध्यमातून नागरिक व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, बँक खाते उघडणे, जातीचे दाखले व उत्पन्नाचे दाखले उघडणे यासंदर्भात  शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवून 350 लोकांनी शिबिराचा लाभ घेतला. सावली शाळेतर्फे आयोजित महिला मेळावा व महासमाधान शिबिराचे उद्घाटन स्टेट बँक देवरीचे व्यवस्थापक कमलेश गौतम यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नायब तहसिलदार ओमकार ठाकरे,प्रमुख मार्गदर्शक म्हणून गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे,केंद्रप्रमुख ए.आर.शेंडे,वैद्यकीय अधिकारी डॉ.सुजाता ताराम,डॉ.आर.झेड.येळणे,सरपंच प्रभुदयाल पवार,पोलीस पाटील चंद्रसेन रहांगडाले,संजय मेहर, रामेश्वर पवार ,प्रभाताई मेहर,अनिल भेलावे उपस्थित होते.तसेच यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. समाधान शिबिराला गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवत या शिबीराचा लाभ घेतला. सोबतच महिला मेळाव्याच्या माध्यमातून हळदी-कुंकू कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा ,संगीत खुर्ची स्पर्धा ,उखाणे स्पर्धा घेऊन महिला मेळावा पार पडला.प्रास्ताविक मुख्याध्यापक संदीप तिडके तर कार्यक्रमाचे संचालन पदवीधर शिक्षक दीपक कापसे व कुवर्षा वालदे मॅडम यांनी केले. मान्यवरांचे आभार तुषार कोवले यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मुख्याध्यापक संदीप तिडके, पदवीधर शिक्षक दीपक कापसे, कु. वर्षा वालदे,नंदकिशोर शेंडे,रमेश ताराम,तुषार कोवले, मायाताई ऊईके,मोनिका गुरव तसेच शालेय विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.