40.3 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ देवठाणा येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

देवठाणा येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

0
52

वाशिमदि. २९ : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी दिलेल्या निर्देशानुसार कॉमन मिनीमम प्रोग्रॅम सन २०२० नुसार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. गो. बिलोलीकर यांच्या आदेशान्वये वाशिम तालुक्यातील देवठाणा येथे २५ जानेवारी रोजी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वाशिम येथील अॅड. रामकृष्णजी राठी विधी विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. चिमणे होते, प्रमुख पाहुणे म्हणून विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे उपस्थित होते.

गावातील सर्वसामान्य लोकांना कायद्याविषयी ज्ञान होण्यासाठी, त्यांच्यातील कायद्याविषयीची भीती दूर करण्यासाठी त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावातील नागरिकांना कायद्याविषयी मार्गदर्शन केले.जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव श्री. देशपांडे यांनी शासनाच्या योजनांची माहिती दिली. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. तसेच आपापसातील वाद मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. देशपांडे यांनी यावेळी केले.शिबिराला विधी महाविद्यालायचे प्रा. डॉ. सोनी, प्रा. श्रीमती धुमाळे, प्रा. श्रीमती दाभाडे, यांच्यासह सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व नागरिक उपस्थित होते.