32.9 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home विदर्भ उत्तर प्रदेशचे राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल गोंदियात

उत्तर प्रदेशचे राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल गोंदियात

0
35

गोंदिया,दि.31 : उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल ह्या आज 1 फेब्रुवारी रोजी गोंदिया येथे येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 9:30 वाजता लखनौ येथील चौधरी चरणसिंग विमानतळ येथून विशेष विमानाने गोंदियाकडे प्रयाण करतील. सकाळी 10:45  वाजता बिरसी विमानतळ गोंदिया येथे आगमन. विमानतळावर सकाळी 10:50 ते 11 वाजतापर्यंत त्या मानवंदना स्विकारतील. सकाळी 11 वाजता बिरसी विमानतळ येथून मोटारीने गोंदियाकडे प्रयाण करतील. सकाळी 11:20 वाजता मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थेत आगमन. सकाळी 11.20 ते दुपारी 1.45 वाजतापर्यंत संस्थेत आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती. दुपारी 1.45  वाजता खा. प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी 1.50  वाजता खा. पटेल यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता बिरसी विमानतळ गोंदियाकडे प्रयाण. दुपारी 3.20 वाजता बिरसी विमानतळ येथे आगमन. दुपारी 3.30 वाजता विशेष विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.