अर्जुनी मोरगाव,दि.01ः- माता बोदराई बहुउद्देशीय शिक्षण संस्था पवनी धाबे स्थानीय बिरसामुंडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने काल दिनांक 31 जानेवारीला आदिवासी मेळावा व माधवराव पाटील डोंगरवार विद्यालयचे स्नेह संमेलनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माता बोंद्रे शिक्षण बहुउद्देशीय शिक्षण संस्था पवनीचे अध्यक्ष शामराव ठवरे, होमराज कापगते, रत्नदीप दहिवले,आदिवासी फेडरेशनचे महासचिव दुर्गाप्रसाद कोकोडे, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष भागवत नाकाडे, सरपंच संजय खरवडे. परसोडी रयतचे सरपंच अनिल कुंभरे, माजी जी. प. अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, प्रकल्प अधिकारी चौधरी,भुमाला कुंभरे, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
गावाच्या प्रवेशद्वारावर ढोल-ताशांच्या गजरामध्ये आदिवासी वाद्यांच्या मधुर वाद्य व नृत्याच्या गजरात प्रवेशद्वारावर स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावातील मुख्य चौकात असलेल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करून प्रमुख अतिथी कार्यक्रमाच्या स्थळी विराजमान झाले. याप्रसंगी माधवराव पाटील डोंगरवार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम सादर केली.याप्रसंगी प्रास्ताविकामध्ये शाळेचे मुख्याध्यापक खुने यांनी संस्थेच्या स्थापनेपासून इतिहास विषद केला. कार्यक्रमाचे आयोजक श्याम शामराव ठवरे यांनी आदिवासी क्षेत्रातील जनतेच्या विविध समस्यांची जाणीव करून देत वीस वर्ष लोटूनही अजूनही अनेक लाभार्थ्यांना त्यांचे पट्टे मिळाले नसल्यामुळे आपण या ठिकाणी प्रमुख्याने कार्य करावे व उर्वरित सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या वनजमिनीचे पट्टे देण्यात यावे.प्रत्येक लाभार्थ्यांचा स्वतंत्र सातबारा त्यांना शासनाच्या वतीने त्वरित देण्यात यावे याकरिता विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना विनंती केली.
फेडरेशनचे महासचिव दुर्गाप्रसाद कोकडे यांनी कार्यक्रमाचे औचित्य साधून आदिवासींसाठी विविध योजनांची माहिती दिली व कचारगड देवस्थान साठी शंभर कोटीची निधी शासनाच्या वतीने देण्यात यादी जेणेकरून हे स्थळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव लौकिक करेल असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यूपीएससी व एमपीएससी मध्ये जागा मिळावी आदिवासींच्या बॅक्लक भरण्यात यावा त्यांना शबरी घरकुल योजनेचे चे लाभ त्वरित देण्यात यावा अशा अनेक मागण्या त्यांनी केल्या.
शिक्षणाच्या अभावामुळे आदिवासी समाज विकासापासून दूर राहिल्याचे याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केली अतिरिक्त वनजमिनीचे पट्टे ला धारकांना त्वरित देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार असून त्यांचा सगळ्यांना लाभ होणार आहे, अशी या प्रसंगी त्यांनी ग्वाही दिली. तसेच महाराष्ट्र शासन पुढील दोन तीन महिन्यांमध्ये 75 हजार नवीन नोकऱ्यांची मेगा भरती करणार आहे. याकरिता आदिवासी युवकांनी स्पर्धा परीक्षेसाठी तयार राहा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. तसेच गावातील बिरसा मुंडा चे पुतळ्यावर छत्र उभारणीसाठी लागणारा निधी देण्यात येईल अशी घोषणा याप्रसंगी आमदार चंद्रिकापुरे यांनी केली.
कायद्याचा धाक दाखवून आदिवासी क्षेत्रातील जनतेला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार आहोत. वनजमिनीचे प्रश्न निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्र वाईज कॅम्प लावणार असून सर्व प्रश्न काही दिवसात निकाली काढण्याचे आश्वासन पटोले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिले. अधिकाऱ्यांच्या अधिकारी प्रवृत्तीमुळे सामान्य जनतेचे प्रश्न सोडविताना अडचण निर्माण होत आहेत याकरिता लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. मात्र अधिकाऱ्यांनी जनतेसाठी काम करावे काम न केल्यास त्यावर कारवाई करू असा सज्जड दम याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. आपल्या सर्वांचे माझ्यावर अनेक ऋण आहेत ते ऋण फेडण्याची जबाबदारी आता माझ्यावर आलेली आहे, आपणास पुढील काळात दिसून येईल असे ते पुढे म्हणाले. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याची व्यवस्था आम्ही करू विश्वासाचे फलित झाली पाहिजे अशी माझी भूमिका राहणार आहे. माझी सुरक्षा करण्याचे काम जनता स्वतः करते त्यामुळे मला कसल्याही प्रकारची विशेष सुरक्षा शासनाकडून नको असल्याचे त्यांनी या प्रसंगी प्रामुख्याने उल्लेखित केली. सन 2021 मध्ये जनगणना होणार आहे मात्र ती जनगणना जातीनिहाय झाली पाहिजे न झाल्यास आपण सर्व जनतेने बहिष्कार करावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.विधानसभेच्या पटलावर हा मुद्दा मी स्वतः ठराव घेण्यास लावलेला आहे बाबासाहेबांच्या बहुजनहिताय धोरन जोपासावे लागेल तरच आपली भारतीय लोकशाही टिकून राहील असे त्यांनी पुढे बोलताना म्हटले. दिवसाला बारा तास शेतीकरिता वीजपुरवठा करण्याच्या सूचना मी केलेले आहेत मला कायदे बनवण्याचा अधिकार नसला तरी आदेश देण्याचे अधिकार मला आहेत. 2020 हे वर्ष विकासाचे ठरवायचे आहे त्यामुळे सर्व जनतेनी या विकासामध्ये आपले सहकार्य करावे असे आव्हान त्यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम च्या गायनाने करण्यात आला. याप्रसंगी आभार बिरसा मुंडा समितीचे अध्यक्ष गोवर्धन सयाम यांनी मानले.





