38 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ चांगले समाज घडविण्यासाठी योग्य शिक्षणाबरोबरच संस्कृती व संस्कार महत्वाचे- राज्यपाल आनंदीबेन पटेल

चांगले समाज घडविण्यासाठी योग्य शिक्षणाबरोबरच संस्कृती व संस्कार महत्वाचे- राज्यपाल आनंदीबेन पटेल

0
34

श्री गुजराती केलवणी मंडळाच्या शताब्दी वर्षपूर्ती सोहळा व सत्कार समारंभ
गोंदिया,दि.01 : गुजराती केलवणी मंडळाला शंभर वर्षे पुर्ण झाले आहे़ ही गौरवाची बाब असून या शंभर वर्षाच्या काळात लाखो विद्यार्थी घडले असून अनेक मोठ्या पदावर कार्यरत आहे़ तर आजही या मंडळांतर्गत येणाºया शाळांमध्ये एक चांगले शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते़ सद्याच्या नवीन तंत्रज्ञानाच्या काळातही चांगले सुसंस्कारीत व आधुनिक शिक्षण येथे दिले जात असून आजघडीला चांगले समाज घडविण्यासाठी योग्य शिक्षणाबरोबरच संस्कृती व संस्काराची जोड असणे महत्वाचे आहे़ असे प्रतिपादन उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केले़
गुजराती केलवणी मंडळाच्या शताब्दी वर्षपूर्ती सोहळा व सत्कार समारंभ तसेच अत्याधुनिक  कम्प्यूटर लॅबच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी त्या बोलत होत्या़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यसभा खासदार प्रफूल्ल पटेल होते़ यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अदाणी गृपचे चेअरमेन संस्थापक गौतम अदाणी, अदाणी फऊंडेशनच्या अध्यक्ष डॉ़ प्रिती अदाणी, कोकीलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पीटलच्या अध्यक्षा टीना अंबानी तर विशेष अतिथी म्हणून प्रसिध्द लेखक व अभिनेता मनोज जोशी, गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल, गुजरातचे माजी आमदार जयंत पटेल (बोक्सी) ट्रस्टचे सचिव हरीहरभाई पटेल, गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल, अर्जुनी मोरगावचे आमदार मनोहर चंद्रिकापूरे, तुमसरचे आमदार राजु कारेमोरे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी मंत्री नाना पंचबुध्दे, माजी खा़ डॉ़ खुशाल बोपचे आदी उपस्थित होते़blank
पुढे बोलताना आनंदीबेन म्हणाल्या की, येणारी पिढी घडविण्यासाठी प्राथमीक शिक्षण महत्वाचे आहे़ म्हणून मुलांना प्राथमीक शिक्षण देतेवेळीच चांगले संस्कार देणे गरजेचे आहे़ गरीबातून गरीब विद्यार्थी शिक्षण घेईल तरच भारत पुढे जाईल व देशाचा विकास होईल़ विशेषत: मुलांना आईच्या गर्भातूनच योग्य शिक्षण व सुसंस्काराचे धडे देणे गरजेचे असून जर्मनी सारख्या देशात महाभारताला महत्व देत चक्रव्हूवच्या प्रसंगाला पुढे ठेवत गर्भवती महिलांना शाळांमध्ये प्रवेश दिले जाते़ कारण गर्भातून मुले शिक्षण घेत असतात हे आपण आपल्या पुराणातही वाचलो आहोत़ आज आपला भारत देश चांगली प्रगती करीत असून यात महिलांचा सिंहाचा वाटा आहे़ विमान उडविण्यापासून तर सिमेवर आपल्या दुश्मनाबरोबर लढण्यातही देशाच्या मुली अग्रेसर आहे़ असे असले तरी देशात कुपोषणही वाढत असल्याचे चित्र आहे़ हि चिंतेची बाब आहे़ त्याचे कारणही तसेच असून महिला सशक्त नाही़  आणि महिला सशक्त नसल्याने येणारा समाजही कुपोषीत होतो़ त्यासाठी महिलांना विशेषत: मुलींना सशक्त करणे गरजेचे आहे़ कारण कुपोषणमुक्त भारत घडवायचा असेल तर मुलींना सशक्त राहणे गरजेचे आहे़ आणि म्हणून त्यासाठीच पंतप्रधानांनी आयुष्यमान भारत सारखी योजना देशात आणली असून नवनवीन उपक्रम आरोग्यच्या बाबतीत राबविले जात असल्याचे सांगत त्यांनी आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनाला उजाळा देत चौथ्या वर्गानंतर पुढेचे शिक्षण आपण कसे पुर्ण केले व कुणाचे मार्गदर्शन लाभले याविषयी त्यांनी यावेळी सांगितले़ तर गुजराती केलवणी मंडळातर्फे शंभर वर्षापासूनची जी शिक्षणाची गंगा वाहत आहे हे गौरवास्पद असल्याचे सांगत खा़ प्रफूल्ल पटेल यांनी या मंडळाला फार मोठ्या स्तरावर नेत आज आधुनिक शिक्षण येथील विद्यार्थी घेत असून हे गौरवाची बाब असल्याचे सांगितले़ तर जोपर्यंत चांगले संचालक मंडळ, चांगले शिक्षक मिळत नाही तो पर्यंत कोणतीही संस्था असो ती पुढे जात नाही असे बोलून मंडळाच्या पदाधिकाºयांसह मंडळांतर्गत येणाºया सर्व शाळा महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे कौतूकही त्यांनी यावेळी केले़
यावेळी अभिनेता मनोज जोशी यांनी मातृभाषेवर जोर देत आपण कोणत्याही भाषेत शिक्षण घ्या मात्र आपल्या मातृभाषेविषयी न्यूनगंड न पाळता आपल्या मातृभाषेचे आदर करण्याचे मार्गदर्शन केले़ यावेळी गौतम अदाणी व टीना अंबानी यांनीदेखील मार्गदर्शन केले़ सर्वप्रथम डिजिटल अत्याधुनिक कम्प्यूटर लॅबचे उद्घाटन राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले़ कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली़ तद्नंतर गुजराती शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत केले़ प्रसंगी संस्था संचालक सचिव जयेश पटेल यांनी संस्थेच्या शंभर वर्षाच्या कार्यकाळाची माहिती दिली़ दरम्यान, खा़ प्रफूल्ल पटेल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गुजराती शाळा ही नावाने गुजराती असली तरी या शाळेत प्रत्येकच समाजातील विद्यार्थी शिक्षण घेत असून मंडळला शंभर वर्ष पुर्ण होणे ही बाब केवळ गुजराती समाज किंवा मंडळासाठीच नाही तर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असल्याचे सांगितले़ प्रसंगी मंडळाच्या शताब्दी वर्षपुर्ती निमीत्त प्रकाशित माहिती पुस्तिकेचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले़ तर मंडळाच्या संस्थापक संचालकांच्या कुटूंबी व गुजराती शाळेत शिक्षण घेऊन देशात उच्च पदावर कार्यरत काही विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार यावेळी करण्यात आला़ कार्यक्रमाचे संचालन माजी आ़ राजेंद्र जैन, चंदे्रश माधवानी यांनी तर आभार अजय वडेरा यांनी मानले़