36.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ गायत्री परिवार विश्व कल्याणासाठी सदैव तत्पर – आ. विनोद अग्रवाल

गायत्री परिवार विश्व कल्याणासाठी सदैव तत्पर – आ. विनोद अग्रवाल

0
23
गोंदिया,दि.03ः गायत्री परिवाराने नेहमीच सामाजिक कार्य करून समाजाचा कल्याण करण्यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत. गायत्री शक्तिपीठ मार्फत समाजात सामाजिक आणि धार्मिक एकोपा तयार करण्याचे कार्य केलेले आहे. व्यसनमुक्ती, महिला सशक्तीकरण, महिला सबळीकरण, युवा जागृती अशा विविध विषयांवर नेहमी कार्य केलेले आहे. गायत्री परिवाराने नेहमीच विश्वकल्याणासाठी कार्य केले असून गायत्री परिवार एका विशाल वटवृक्षाप्रमाणे प्रत्येक गावात पोचलेला आहे असे आमदार विनोद अग्रवाल हे बोलले. ते गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे आयोजित श्री गायत्री प्रज्ञापीठच्या पाचव्या वार्षिक प्राणप्रतिष्ठा आणि वसंत पंचमी समारोहात बोलत होते. 25 जानेवारीपासून सुरू असलेल्या गायत्री साधना समारोहाच्या समापन सोहळ्यात आमदार विनोद अग्रवाल यांनी उपस्थित दासगाव नागरिकांना मार्गदर्शन केले. ते कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. नऊ दिवसीय श्री गायत्री साधना समारोह यामुळे नागरिकांना एकाग्रता आणि चिंतनाचे धडे घेता आले यासाठी आयोजकांचे अभिनंदन करत उपस्थित नागरिकांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा आमदार विनोद अग्रवाल यांनी दिल्या. कार्यक्रमाचे अतिथी म्हणून चम्पालाल माहेश्वरी, पंडित शिवलोचन मिश्रा, रामराज खरे, छत्रपाल तुरकर, भाऊराव उके इत्यादी मंडळी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गायत्री परिवार ट्रस्ट दासगाव मार्फत करण्यात आले होते.
Attachments area