गडचिरोली,दि.3:नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत दि. 30 डिसेंबर 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्दी करण्यांत आली आहे. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी झाल्यानंतरही निरंतर मतदार नोंदणी सुरु राहणार आहे. त्याअनुषंगाने विहित कार्यपध्दतीनुसार निकाली काढण्यास पात्र असलेले दावे, नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत निकाली काढून पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. तसेच मतदार नोंदणी करण्यासाठी Online सुविधा https://ceo.maarashtra.fov.in/gonline/Form18 या लिंकवर उपलब्ध करण्यात आलेली आहे. तरी सर्व पात्र पदवीधरांनी आपले दावे व हरकती दाखल करण्याकरीता आवाहन करण्यात येत आहे.अधिक माहितीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर किंवा जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यांचेशी कृपया संपर्क साधावा असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.




